कोलंबो: येथे चालू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव ९ बाद ६२२वर घोषित केला आहे. दुसऱ्या दिवशी आर अश्विन, वृद्धिमान सहा आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकी खेळी केल्या तर श्रीलंकेकडून रंगाना हेराथने ४ तर कसोटी पदार्पण केलेल्या पुष्पाकुमाराने २ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताने पहिल्या कसोटीत पहिल्या डावातही ६०० धावा केल्या होत्या. भारताची ही लंकेतील दुसरी सर्वात मोठी कसोटी धावसंख्या असून यापूर्वी २०१० साली भारताने लंकेत ७०७ धावा केल्या होत्या.
एखाद्या संघाने ४वेळा ६०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे तर भारताने डिसेंबर २०१६ पासून ६व्यांदा ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.