कोलंबो: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरूद्ध भारत कसोटी सामन्यात भारताने तिसऱ्या दिवशी १२:३० वाजता श्रीलंकेच्या सर्व फलंदाजांना परतीचा रस्ता दाखवला. यात अश्विनने पाच विकेट्स घेतल्या तर जडेजा आणि शमीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज उमेश यादवने १ विकेट घेतली. पहिल्या डावानंतर भारताकडे ४३९ धावांची आघाडी होती.
या नंतर भारत फॉलो-ऑन देणार का पुन्हा फलंदाजी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मागील कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला फॉलो-ऑन न देता भारतीय कर्णधाराने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा सामना जरी भारतने जिंकला आला तरी या निर्णयावर क्रिकेट पंडितांनी खूप टीका केल्या होत्या.
पण आज विराटने जे पहिल्या सामन्यात केले तेच न करता श्रीलंकेला फॉलो-ऑन देऊन पुन्हा फलंदाजीस आमंत्रित केले आणि हा निर्णय बरोबर ठरला व भारताच्या उमेश यादवने चौथ्याच षटकात उपुल थरंगाला बाद केले. जर भारताने पहिल्या डावातील गोलंदाजीसारखीच चांगली गोलंदाजी दुसऱ्या डावात केली तर आजच सामन्याचा निकाल लागेल.
पाहुयात भारताचे या आधीचे कर्णधार ज्यांनी समोरच्या संघाला किती फॉलो-ऑन दिले ते
७ – मोहम्मद अझरुद्दीन
४- गांगुली / महेंद्रसिंग धोनी
३ – गावस्कर / द्रविड / कोहली