---Advertisement---

भारतीय संघाला ट्रोल करणे इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूला पडले भलतेच महागात

On: गुरूवार, जानेवारी 31, 2019 4:31 PM
---Advertisement---

हॅमिल्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(31 जानेवारी) पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्स आणि 212 चेंडू बाकी ठेवत विजय मिळवला आहे.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 92 धावा केल्या होत्या. भारताची ही धावसंख्या बघून इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी ट्विट करत ट्रोल केले आहे. त्यांच्या या ट्विटला भारतीय चाहत्यांनी प्रतिक्रीया देत त्यांनाच ट्रोल केले आहे.

“भारत 92 धावांवर सर्वबाद …विश्वास नाही बसत की आजच्या काळातही संघ 100 धावांच्या आत सर्वबाद होत आहे”, असे ट्विट वॉन यांनी केले होते.

भारतीय चाहत्यांनी काही दिवसांपूर्वीच बार्बाडोस येथे झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ विंडीज विरुद्ध 77 धावांवर सर्वबाद झाला होता,  यावरून वॉन यांना ट्रोल केले आहे.

https://twitter.com/magicumesh/status/1090831824928964609

आज भारताने दिलेले 93 आव्हान न्यूझीलंडने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 14.4 षटकात सहज पार केले. न्यूझीलंडकडून रॉस टेलरने सर्वाधिक नाबाद 37 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

पराभवाचे कारण कर्णधार रोहित शर्माने केले स्पष्ट

२००वा वन-डे सामना आणि विराट-रोहितच्या बाबतीत झाला हा योगायोग

९६० वनडे खेळलेल्या टीम इंडियाच्या बाबतीत दुसऱ्यांदाच असे घडले…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment