---Advertisement---

Commonwealth Games 2026: उद्घाटन सोहळ्यापूर्वीच भारताचे पहिले पदक कन्फर्म, जाणून घ्या कसे?

On: गुरूवार, जुलै 23, 2026 5:38 PM
---Advertisement---

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 (Commonwealth Games) स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये होणार आहे. यामध्ये भारताला 125 खेळाडूंकडून सर्वाधिक पदकांची आशा आहे. त्यातील एकाने देशाचे पहिले पदक निश्चित केले आहे. स्टार महिला बॉक्सर आणि माजी ऑलिम्पिक पदक विजेती, लव्हलिना बोरगोहेनने हे पदक निश्चित केले आहे.

आसामच्या लव्हलिनाने 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तिने थेट अंतिम चारमध्ये स्थान मिळवल्याने रिंगमध्ये न उतरताच तिने पदक पक्के केले आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंगच्या नियमानुसार, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या सर्व खेळाडूंना कांस्य पदक दिले जाते. त्यामुळे ग्लासगोमधील लव्हलिनाच्या पहिल्या लढतीआधीच तिचे किमान कांस्य पदक निश्चित झाले आहे.

लव्हलिनाला पाच बॉक्सर असलेल्या स्पर्धेत ‘बाय’ मिळाला. त्यामुळे तिने थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत केवळ पाच खेळाडू आहे. लव्हलिनासोबत तीन स्पर्धकांनी अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. तर बाकी खेळाडूंमध्ये एकमेव उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लढत होणार होती.

भारतीय संघ 24 जुलै रोजी लॉन बाउल्स स्पर्धेने 2026 च्या हंगामाची सुरूवात करणार आहे. तसेच लव्हलिना 31 जुलै रोजी उपांत्य फेरीत ताफाकीविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरूवात करेल. विजय मिळाल्यास ती अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी लढेल. पराभव झाल्यास मात्र तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागेल.

यंदाच्या स्पर्धेत केवळ 10 खेळांचे आयोजन केले आहे. त्यामुळे भारताच्या पदकांमध्ये घट होण्याची शक्यता आहे, कारण भारताने 31 पदके जिंकलेल्या सहा खेळांपैकी हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती आणि क्रिकेट यांना 2026 च्या स्पर्धेतून वगळण्यात आले आहे.

ग्लासगोमधील 10 पैकी 8 खेळांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. या स्पर्धेत भारताचा सहभाग बॉक्सिंगसह ऍथलेटिक्स, वेटलिफ्टिंग, ज्युडो, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक, ट्रॅक सायकलिंग, लॉन बाउल्स आणि स्विमिंग यामध्ये आहे.

ऍथलेटिक्स स्पर्धा 27 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान होणार आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रावर असणार आहे. त्याने 2018 च्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते, तर 2022 मध्ये दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नाही. (India first medal Commonwealth Games 2026 is confirm with boxer Lovlina Borohain)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---