आशिया चषक २०२२ साठी भारतीय संघाची सोमवारी (८ ऑगस्ट) घोषणा करण्यात आली. आश्चर्यकारक बाब म्हणजे संघात केवळ तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे, तर चार फिरकी गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. आशिया चषक स्पर्धेचे सामने २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत खेळवले जाणार आहेत आणि यादरम्यान दुबईच्या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते, अशा परिस्थितीत टीम इंडियाचा हा डाव उलटता कामा नये. शारजाच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंसाठी मदत असली, तरी भारताचे बहुतांश सामने दुबईत होणार आहेत, अशा स्थितीत निवड समितीच्या या निर्णयाबद्दल अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित केले जात आहेत.
आयपीएल २०२१ असो किंवा टी-२० वर्ल्ड कप २०२१ असो, दुबईच्या खेळपट्ट्यांवर सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांसाठी बाऊन्स होता आणि शेवटी थोडासा स्विंग होता हे आपण पाहिले. अशा स्थितीत आशिया चषकात केवळ तीन वेगवान गोलंदाजांसह प्रवेश करण्याचा निर्णय पचनी पडत नाही. हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही दुखापतींमुळे आशिया चषकाचा भाग नसले तरी मोहम्मद शमीची निवड न होणे ही आश्चर्याची बाब आहे.
भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांची वेगवान गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे तर फिरकीपटूंचा विचार केल्यास युझवेंद्र चहल, आर अश्विन, रवी बिश्नोई आणि रवींद्र जडेजा हे संघात आहेत. निवडकर्त्यांनी दीपक चहर, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांना तीन राखीव खेळाडू म्हणून निवडले आहे, याचा अर्थ जर आपण राखीव खेळाडूंचा समावेश केला तर एकूण चार वेगवान गोलंदाज आणि पाच फिरकीपटू आहेत.
आयपीएल २०२१ बद्दल बोलायचे झाले तर लीगचा दुसरा टप्पा सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान युएई मध्ये खेळला गेला. हर्षल पटेल, आवेश खान, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांनी क्रमवारीत स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या, याचा अर्थ टॉप-५ सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत एकाही फिरकी गोलंदाजाचा समावेश नव्हता. टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये वनिंदू हसरंगा हा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज असला तरी ट्रेंट बोल्ट, जोश हेझलवूड आणि ऍनरिच नॉर्खिया यांनी त्यांच्या गोलंदाजीत विशेष चमक दाखवली होती. त्यामुळे युएईतील खेळपट्टी आणि इतिहासाचा अभ्यास केल्यास भारताने संघनिवडीत चुका केल्याचे समोर येत आहे. मात्र, असे असले तरू टीमइंडियाने भविष्याचा विचार करत हा निर्णय घेतला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज पर्मनंट!’ एका वाक्यात दिग्गजाने केली विराटची पाठराखण
‘अर्शदीप सिंग ठरतोय आवेश खानपेक्षाही वरचंढ’, भारताच्या माजी दिग्गजाने केलाय दावा
अश्विनला आशिया कपसाठी निवडल्याने संतापला भारतीय दिग्गज; म्हणाला, “दरवेळी त्याला…”