भारतीय संघात सध्या ४थ्या क्रमांकासाठी चर्चा सुरु आहे. श्रेयस अय्यर हा मुंबईकर खेळाडू या क्रमांकावर बऱ्यापैकी स्थिरावत आहे. याशिवाय या क्रमांकासाठीच्या शर्यतीत भारतीय संघाकडे तब्बल ११ पर्यायी खेळाडू आहेत. तर यातील ३ नावे ही मराठी खेळाडूंची आहेत. या खेळाडूंनी भारतीय संघाच्या अनेक लहान-मोठ्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे.
यातील काही खेळाडूंनी भारताकडून यापुर्वी क्रिकेट खेळले आहे. तसेच चौथ्या क्रमांकावरही नशीब आजमावले आहे. गेल्या दोन वर्षात भारताकडून या क्रमांकावर अंबाती रायडू, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, विजय शंकर, केएल राहुल व विराट कोहली यांनी फलंदाजी केली आहे. यात श्रेयस अय्यर सर्वात यशस्वी ठरला आहे.
४थ्या क्रमांकासाठी भारताकडे असणारे १२ खेळाडू-
श्रेयस अय्यर, केएल राहुल, अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, मनीष पांडे, शुबमन गिल, रिषभ पंत, विजय शंकर, सुरेश रैना, करूण नायर, संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव ही नावे ४थ्या क्रमांकासाठी भारतीय संघाकडे आहेत.
भारतीय संघात ४थ्या क्रमांकासाठी पर्याय असणारे ३ मराठी खेळाडू-
१. अजिंक्य रहाणे, २. सूर्यकुमार यादव, ३. श्रेयस अय्यर
ट्रेंडिंग घडामोडी-
-कॅप्टन कूल धोनीच्या चेन्नईला सतत त्रास देणारे हे ३ खेळाडू
-अशा क्रिकेट टीम ज्यांच्या नावात येतात प्राण्यांची विचित्र नाव
-मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही धावला कोरोना बाधितांच्या मदतीसाठी