रोहित शर्मा कर्णधार म्हणून आणखी एक टी२० मालिका जिंकण्याच्या जवळ आहे. त्याने याआधीच सलग १३ टी-२० सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी२० सामना (IND vs ENG) ९ जुलै रोजी होणार आहे. भारतीय संघ ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.
भारताने पहिल्या टी२० सामन्यात इंग्लंडवर ५० धावांनी आरामात विजय नोंदवला. आजचा सामना संघाने जिंकला तर ते मालिकेवर कब्जा करतील. गेल्या तीन द्विपक्षीय मालिकांबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाने बाजी मारली आहे. यादरम्यान संघाने २-१, २-१ आणि ३-२ असा विजय मिळवला आहे.
मात्र, या मलिकेत विजय मिळवण्यासाठी कर्णधार रोहित शर्माला फॉर्म मध्ये परतावे लागेल. आयपीएल २०२२ मध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने २४ धावा केल्या होत्या. गेल्या ७ टी२० आंतरराष्ट्रीय डावांमध्ये त्याला एकदाही अर्धशतक पूर्ण करता आलेले नाही.
अष्टपैलू हार्दिक पंड्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात चमकदार कामगिरी केली. यापूर्वी त्याने अर्धशतकी खेळी खेळली होती. त्यानंतर ४ बळी घेत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. याशिवाय दीपक हुडा आणि सूर्यकुमार यादव यांनीही आक्रमक खेळी केली.
विराट कोहली, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराहसारखे दिग्गज खेळाडू दुसऱ्या टी२० सामन्यातून पुनरागमन करत आहेत. या सर्वांना ५ व्या कसोटी सामन्यामुळे पहिल्या टी२० सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. पंत चांगल्या फॉर्मात आहे. त्याने ५व्या कसोटीच्या पहिल्या डावात शतक तर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले.
इंग्लंडचा नवा कर्णधार जोस बटलरला युवा खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. मोईन अलीशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला पहिल्या सामन्यात ३० धावांचा टप्पा गाठता आला नाही. याशिवाय गोलंदाजही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. त्यामुळे दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडचा संघ जोरदार पुनरागमन करेल असा अंदाज आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvENG। ५ महिन्यांनंतर टी२०मध्ये पुनरागमन करणाऱ्या विराटला संघात स्थान मिळणार का?
विम्बल्डन २०२२। जोकोविच आठव्यांदा अंतिम फेरीत दाखल; फेडरर, नदालचेही मोडले विक्रम
कमवण्यासाठी आयुष्य कमी पडेल इतक्या कोटीत स्मिथने विकलाय बंगला, रक्कम वाचून डोळेच फिरतील