तब्बल 140 कोटी भारतीयांसाठी शनिवारचा (दि. 07 ऑक्टोबर) दिवस खूपच महत्त्वाचा आहे. यामागील कारण आहे आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मधील टी20 क्रिकेट खेळाचा अंतिम सामना. चीनच्या हांगझोऊ येथील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट फील्ड मैदानात हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने आहेत. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक भारतीय संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला.
स्पर्धेतील कामगिरी
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने (Team India) आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 (Asian Games 2023)मध्ये आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. त्यातील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने नेपाळचा 23 धावांनी धुव्वा उडवला होता. तसेच, त्यानंतर भारताने पहिल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशला 9 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला.
🚨 𝐀𝐒𝐈𝐀𝐍 𝐆𝐀𝐌𝐄𝐒 𝐅𝐈𝐍𝐀𝐋 🚨@BCCI have won the toss and opted to bowl first. 👍#AfghanAbdalyan | #AsianGames | #AFGvIND pic.twitter.com/82jmLXj4ep
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 7, 2023
दुसरीकडे, गुलबदीन नईब (Gulbadin Naib) याच्या नेतृत्वातील अफगाणिस्तान संघ स्पर्धेतील तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 8 धावांनी जिंकला होता. यानंतर दुसऱ्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला 4 विकेट्सने पराभवाचा धक्का देत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. (India have won the toss and have opted to field against afghanistan in asian games 2023 final)
अंतिम सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
यशस्वी जयसवाल, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आर साई किशोर, अर्शदीप सिंग
अफगाणिस्तान
झुबैद अकबरी, मोहम्मद शहजाद (यष्टीरक्षक), नूर अली जादरान, शाहिदुल्ला कमाल, अफसर झझाई, करीम जनात, गुलबदीन नायब (कर्णधार), शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, फरीद अहमद मलिक, जहिर खान
हेही वाचा-
Asian Gamesमध्ये पाकिस्तानची लईच वाईट अवस्था, कांस्य पदकाच्या सामन्यात बांगलादेशने अखेरच्या चेंडूवर लोळवलं
विश्वचषक 2003मध्ये 7 षटकात 67 धावा ते 2011ला 3 मेडन ओव्हर टाकणाऱ्या झहीरचा 45वा बड्डे, खास गोष्टी वाचा