---Advertisement---

Asia Cup 2023: सुपर-4 च्या अखेरच्या सामन्यात ‘हिटमॅन’ने जिंकला टॉस, तिलक वर्मासह ‘या’ खेळाडूचे वनडे पदार्पण

Team-India
---Advertisement---

शुक्रवारी (दि. 15 सप्टेंबर) आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीचा सहावा आणि अखेरचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध बांगलादेश संघ आमने-सामने असणार आहेत. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, तिलक वर्मा याने या सामन्याद्वारे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. यादरम्यानचे फोटोही बीसीसीआयने शेअर केले आहेत.

भारतीय संघाने या सामन्यासाठी तब्बल 5 बदल केले आहेत. यामध्ये तिलक वर्मा वनडे पदार्पण (Tilak Varma ODI Debut) करत आहे. तसेच, मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि प्रसिद्ध कृष्णा यांचे संघात पुमरागमन झाले आहे. याव्यतिरिक्त शार्दुल ठाकूर आणि सूर्यकुमार यादवलाही संघात संधी मिळाली आहे. दुसरीकडे, बांगलादेश संघाचा फलंदाज तंजीम हसन (Tanzim Hasan) हादेखील वनडे पदार्पण करत आहे.

भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.

https://twitter.com/BCCI/status/1702610091554521262

बांगलादेश संघ
लिटन दास (यष्टीरक्षक), तंजीद हसन, अनमूल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तंजीम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.

अंतिम सामन्यात भारत-श्रीलंका आमने-सामने
विशेष म्हणजे, आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन संघ निश्चित झाले आहेत. हा सामना भारत विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ बांगलादेशचा सामना करताना दिसेल. (India have won the toss and have opted to field against bangladesh asia cup 2023)

हेही वाचा-
भारताची विश्वचषकातील ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल, ‘यंदा World Cup Trophy आपलीच’
‘संपूर्ण जग पाकिस्तानला…’, Asia Cup 2023मधून PAK संघ बाहेर पडताच कडाडला शोएब अख्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---