गयाना। आज(6 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात तिसरा टी20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होणार होता. पण पावासाच्या व्यत्ययामुळे सामन्याला उशीर झाला असून आता सामना रात्री 9.10 पर्यंत सुरु होणार आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार विराटने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाने तीन बदल केले आहेत. उपकर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू रविंद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे. तसेच खलील अहमदही या सामन्यात खेळणार नाही. त्यांच्याऐवजी केएल राहुल, दिपक चाहर आणि राहुल चाहर यांना 11 जणांच्या संघात संधी मिळाली आहे.
राहुल चाहर या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. त्याला विराट कोहलीच्या हस्ते भारतीय संघाची कॅप देण्यात आली.
त्याचबरोबर विंडीज संघाने फॅबिएन ऍलेनला 11 जणांच्या संघात संधी दिली आहे. तसेच या सामन्यातही सुनील नारायण सलामीली फलंदाजी करताना दिसणार आहे.
या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघाने पहिले दोन्ही सामने जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता भारतीय संघ वेस्ट इंडीजला व्हाईटवॉश देण्याच्या इराद्याने तर वेस्ट इंडिज आजचा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याच्या इराद्याने आज मैदानात उतरेल.
तिसऱ्या टी20 सामन्यासाठी असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), मनीष पांडे, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी.
वेस्ट इंडीज – सुनील नारायण, एव्हिन लुईस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), किरॉन पोलार्ड, शिमरॉन हेटमेयर, कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, किमो पॉल, शेल्डन कोट्रेल, ओशॅन थॉमस, फॅबियन ऍलन.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–दुसऱ्या ऍशेस सामन्याआधी इंग्लंडला मोठा धक्का!
–भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्याआधी किरॉन पोलार्डला झाली मोठी शिक्षा
–आयपीएमध्ये सर्वात पहिले शतक करणाऱ्या ब्रेंडन मॅक्यूलमची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती