भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. चेन्नईच्या प्रसिद्ध एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) हा सामना खेळवला जाईल. तत्पूर्वी, मालिकेच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार विराट कोहली आभासी पत्रकार परिषदेद्वारे पत्रकारांना सामोरा गेला. आगामी मालिकेत रोहित शर्मा व शुबमन गिल भारतीय संघाला चांगली सुरुवात देतील, असा आशावाद त्याने व्यक्त केला.
विराट गेला पत्रकारांना समोर
कोरोना महामारीनंतर भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय मालिका असलेली भारत-इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका शुक्रवारपासून सुरू होईल. त्याआधी उभय कर्णधारांनी आभासी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
भारतीय कर्णधार विराट कोहली याने भारतीय सलामीवीरांविषयी बोलताना म्हटले, “आम्ही खूप पुढचा विचार करत आहोत. आम्हाला आशा आहे की ते दोघे ( रोहित शर्मा व शुबमन गिल ) मालिकेतील सर्व सामने खेळतील आणि प्रत्येक वेळी भारतीय संघाला चांगली सुरुवात देतील. तुम्ही या आधीचे कसोटी सामन्यांचे निकाल पाहिले तर समजून जाल की, चांगली सुरुवात मिळाल्यानंतर आम्ही सामने जिंकत आलो आहोत.”
यासोबतच भारतीय कर्णधाराने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात रिषभ पंत हा भारतीय संघासाठी यष्टीरक्षण करताना दिसेल, असे सांगितले. वृद्धिमान साहा संघात असतानाही फलंदाजीत चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या पण त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.
#TeamIndia captain @imVkohli speaks about the role @ImRo45 and @RealShubmanGill will play at the top of the batting order in the @Paytm Test series against England. #INDvENG pic.twitter.com/3oOVjzyq8L
— BCCI (@BCCI) February 4, 2021
गिल आणि रोहितची ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी
मागील काही काळापासून भारतीय सलामीवीर सातत्याने अपयशी ठरत होते. मात्र, युवा गिलने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत आत्तापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे पुनरागमनानंतर रोहित देखील चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे संकेत मिळाले आहेत. दोघांनीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीमध्ये भारतीय संघाला अपेक्षित सुरुवात देत विजयाचा पाया रचला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमपर्यंत पोहचले शेतकरी आंदोलन, विराट कोहलीने दिली माहिती
INDvENG : कुठे व केव्हा होणार पहिला कसोटी सामना, जाणून घ्या सर्वकाही
चेन्नईच्या मैदानावरील ‘हे’ १० विक्रम तुम्हाला माहित असायला हवेत