भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा संसदेपासून भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूमपर्यंत चर्चिला जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी झालेल्या आभासी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, ‘टीम मीटिंग’ मध्ये या विषयावर चर्चा झाली होती.
अमेरिकन पॉपस्टार रिहाना हिच्यासह काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाविषयी भाष्य केल्यानंतर बुधवारी (३ फेब्रुवारी) कोहली, सचिन तेंडुलकर, प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी देशात एकता कायम ठेवण्याचे आवाहन केले होते.
विराटने केले होते ट्विट
विराटनेही शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट केले होते. त्याने लिहिले होते की, ‘मतभेदांच्या या वेळी आपण सर्वजण एकत्र होऊया. शेतकरी हा आपल्या देशाचा एक भाग आहे. मला खात्री आहे की, या प्रकरणावर शांततेत तोडगा निघेल आणि सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ.’
Let us all stay united in this hour of disagreements. Farmers are an integral part of our country and I'm sure an amicable solution will be found between all parties to bring about peace and move forward together. #IndiaTogether
— Virat Kohli (@imVkohli) February 3, 2021
अमेरिकन खेळाडूंनी केली मदत
एनएफएलचा प्रसिद्ध खेळाडू जुजू स्मिथने भारतातील नवीन शेतीविषयक कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वैद्यकीय मदतीसाठी १०,००० डॉलर्स दिले आहेत. एनबीए फॉरवर्ड काइल कुज्मा यांनीही या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे. यापूर्वी अमेरिकन पॉपस्टार रिहानानेही या आंदोलनास पाठिंबा दर्शविला होता आणि आंदोलनाच्या ठिकाणी इंटरनेट बंदीसंदर्भात एक बातमी शेअर केली होती.
भारतात सुरू आहे शेतकरी आंदोलन
मागील वर्षी भारत सरकारने तीन कृषी विधेयके पारित केली होती. त्याला विरोध म्हणून मागील जवळपास ७२ दिवसांपासून पंजाबमधील शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिल व संदीप शर्मा यांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvENG : कुठे व केव्हा होणार पहिला कसोटी सामना, जाणून घ्या सर्वकाही
चेन्नईच्या मैदानावरील ‘हे’ १० विक्रम तुम्हाला माहित असायला हवेत






