---Advertisement---

“मी फॉर्ममध्ये आलोय !” ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे भारतीय संघाला आव्हान

On: बुधवार, नोव्हेंबर 25, 2020 8:28 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज स्टीव स्मिथ भारताविरुद्धच्या आगामी मालिकांसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ वनडे, ३ टी२० व चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या ‘हाय व्होल्टेज’ मालिकेसाठी दोन्ही संघ कसून सराव करताना दिसत आहेत. याच मालिकेच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार राहिलेल्या स्टीव स्मिथने भारतीय संघाला आव्हान दिले आहे.

आयपीएलमध्ये स्मिथची निराशाजनक कामगिरी

मालिकेचे अधिकृत प्रसारण करणाऱ्या सोनी वाहिनीशी बोलताना स्मिथने मालिकेविषयी अनेक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली. स्मिथने आपल्या आयपीएलमधील कामगिरीविषयी बोलताना म्हटले, “आयपीएलमधील माझी कामगिरी समाधानकारक नव्हती. मी माझ्या योग्यतेनुसार खेळ दाखवू शकलो नव्हतो. स्पर्धेदरम्यान मी काही चांगल्या खेळ्या केल्या. मात्र, माझ्या खेळात सातत्य नव्हते.”

स्मिथने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना १४ सामन्यात तीन अर्धशतकांचा मदतीने ३११ धावा काढल्या होत्या. अनेक नामांकित खेळाडू असूनही, राजस्थान संघाला गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

मी लय मिळवली आहे- स्मिथने दिली स्पष्टोक्ती

स्वतःच्या फॉर्मविषयी सांगताना स्मिथ म्हणाला, “जे लोक मला जवळून ओळखतात त्यांनी सांगितले की, मी लय मिळवली आहे. आगामी मालिकेसाठी मी उत्साहित आहे. मी अधिकाधिक सरावाची योजना आखली होती आणि ती यशस्वी होतेय, असे मला वाटते. सरावादरम्यान चेंडू बॅटच्या मधोमध लागत आहे. आगामी मालिकेत याचा प्रभाव दिसून येईल.”

भारताविरुद्धची मालिका ऍशेसच्या बरोबरीची

स्टीव स्मिथने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेची तुलना ऍशेस मालिकेसोबत केली. आगामी मालिकेचे महत्त्व सांगताना स्मिथ म्हणाला, “भारताविरुद्धच्या या कसोटी मालिकेसाठी आम्ही सर्वजण खूप उत्साही आहोत. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी व ऍशेस या दोन खूप मोठ्या मालिका आहेत. त्यांचा दर्जा खूप उच्च आहे. एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू म्हणून या मालिकांत खेळण्यासाठी मला नेहमीच आवडते.”

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने होईल. त्यानंतर टी२० मालिका खेळवली जाईल. दौऱ्याची अखेर चार कसोटी सामन्यांच्या ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ ने होईल.

महत्त्वाच्या बातम्या –

“युवा खेळाडूंमध्ये स्पार्क दिसला नाही”, धोनीच्या वक्तव्यावर ऋतुराज गायकवाडने सोडले मौन

धक्कादायक ! रोहितच्या घरात कोरोनाचा शिरकाव; वडिलांना झालीय लागण ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम करण्यास रॉस टेलर सज्ज

ट्रेंडिंग लेख 

कसोटीतील हे तीन दिग्गज कधीच दिसणार नाहीत भारताच्या निळ्या जर्सीत?

ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतके ठोकणारे ‘तीन’ विदेशी धुरंदर, दोन भारतीय कर्णधारांचा समावेश

बॅगी ग्रीन- कहाणी जगातील सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॅपची

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---