लंडन। 9 ते 12 आॅगस्ट दरम्यान इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लॉर्ड्सवर दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताला एक डाव आणि 159 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे इंग्लंडने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.
या पराभवानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्करांनी भारतीय संघाच्या कामगिरीवर टीका केली आहे. तसेच त्यांनी भारताला सरावाची गरज असल्याचे म्हटले आहे.
ते म्हणाले, “मी समजू शकतो त्यांनी आज विश्रांती घेतली आहे. लॉर्ड्स कसोटीतील पराभव सध्या त्यांना सलत असेल. पण त्यांनी पुढील योजना आखुन नॉटिंगहॅमला उद्या रवाना व्हायला हवे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सरावाला सुरुवात करायला हवी.”
“पण वनडे मालिकेपासून आम्ही पाहिले आहे ते लंडनच्या प्रेमात आहेत. तूम्हाला लंडनमध्ये नॉटिंगहॅमप्रमाणे सहजपणे सरावाच्या सुविधा मिळत नाही. आशा आहे की ते मंगळवारपासून सरावाला सुरुवात करतील. तूम्ही जेव्हा असा पराभव पत्करता तेव्हा तुम्हाला सरावाशिवाय पर्याय नसतो.”
याबरोबरच गावस्कर म्हणले, “तूम्हाला फक्त नेटमधील सरावाचीच नाही तर सराव सामन्याचीसुद्धा गरज आहे. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यामध्ये पुरेसे अंतर आहे. यामध्ये सराव सामने होऊ शकतात.
“चौथ्या कसोटीसाठी कदाचीत नवीन खेळाडू संघात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे त्यांनाही सरावासाठी काही वेळेची गरज आहे. या गोष्टीविषयी विचार व्हायला हवा. मी हे दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून सागंत आहे. पण आम्ही आता जून्या काळातील झालो आम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही.”
तसेच गावस्कर कर्णधार विराट कोहलीच्या फिटनेसबद्दल म्हणाले, ‘ विराटला तिसऱ्या कसोटीत खेळण्याबद्दल विश्वास आहे ही चांगली गोष्ट आहे. तो संघातील खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे तो जरी 50 % फिट असला तरी त्याने खेळायला हवे.’
याआधीही गावस्करांनी एजबस्टन कसोटीत भारत पराभूत झाल्यानंतर भारतीय संघावर टीका केली होती.
The Hustle is easier when the company is Great. 😎 @hardikpandya7
📷 :: @KaranSinghvi pic.twitter.com/YYCNP8ulG4
— K L Rahul (@klrahul) July 18, 2018
Sunday gym done right 👏🏻🇮🇳 pic.twitter.com/KgAcphzHAb
— hardik pandya (@hardikpandya7) July 23, 2018
भारतीय संघ तिसऱ्या कसोटीसाठी नॉटिंगहॅम बुधवारी रवाना होणार आहे. भारताचा इंग्लंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना शनिवार 18 आॅगस्टपासून सुरु होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–टीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण
–मुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक
–माजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी