भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अनेकदा विविध कारणांनी चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीबरोबरच सोशल मीडियावरील काही कृतींमुळेही चर्चेत आहे. तो अनेकदा सोशल मीडियावर खेळाडूंच्या वेगवेगळ्या पोस्टवर कमेंट करत त्यांची मजा घेत असतो.
परंतु, यंदा मात्र चहलचाच डाव उलटा पडला आहे. इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅटने(Danielle Wyatt) चहलच्या कमेंटला प्रत्युत्तर देत, त्याला ट्रोल केले आहे.
झाले असे की, महिला क्रिकेट विश्वातील स्फोटक फलंदाज डॅनियल हिने इंस्टाग्रामवर तिचा फोटो शेअर केला. ज्यामध्ये ती वेळी मोठे शॉट मारतानाचा सराव करताना दिसत आहे. त्याबरोबर तिने कॅप्शनमध्ये “मेलबर्नमध्ये परत येऊन आनंद झाला”, असे लिहीले आहे.
https://www.instagram.com/p/B8N1LR8HLsk/
या फोटोला कमेंट करत चहलने ‘666666’ असे लिहीले आहे. ज्याचा अर्थ – एका षटकात सर्व चेंडूंवर षटकार मार, असा होतो. त्याचबरोबर त्याने समोर हसतानाचा इमोजीसुद्धा टाकला आहे.
चहलच्या या कमेंटला डॅनियलने मजेशीर प्रत्त्युत्तर दिले आहे. “होय, जर तू गोलंदाजी करत असशील तर..” असे तिने चहलला प्रत्त्युत्तर देताना लिहिले आहे.
डॅनियलच्या या मजेशीर प्रत्त्युत्तरानंतर चाहत्यांनी अनेक कमेंट्सचा भडिमार केला आहे. सोशल मीडियावर दोन्ही क्रिकेटपटूंनी एकमेकांना ट्रोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
चहल सध्या न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. तर, डॅनियल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तिथे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत संघात महिला तिरंगी टी20 मालिका खेळली जात आहे.
काय सांगता! चक्क न्यूझीलंडचा प्रशिक्षकच क्षेत्ररक्षक म्हणून उतरला मैदानात
वाचा👉https://t.co/uRNZrc0Fai👈#म #मराठी #Cricket #INDvsNZ #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020
२०१९ विश्वचषकानंतरचा टीम इंडियाचा विजयी रथ न्यूझीलंडने रोखला
वाचा👉https://t.co/zpCgyrG7Ok👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020