टी20 मालिकेत 5-0 असे निर्भेळ यश मिळवून भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्याला दमदार सुरुवात केली खरी; पण वनडे मालिकेत मात्र भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आज(8 फेब्रुवारी) ऑकलँड येथे झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील(ODI) दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 22 धावांनी विजय मिळवला.
सामना संपल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली(Virat Kohli) म्हणाला की, ‘हे दोन्ही सामने चाहत्यांसाठी खूप रोमांचक होते.’ भारतीय संघाच्या तळातील फलंदाजांनी त्याला खूप प्रभावित केले. आमची सामना पूर्ण करण्याची पद्धत उत्कृष्ट असल्याचेही कोहलीने पुढे सांगितले.
या सामन्यात न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर(Ross Taylor) आणि गोलंदाज काइल जेमीसन(Kyle Jamieson) यांनी 9 व्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. 42व्या षटकात 8 विकेट्स 197 धावा अशी अवस्था असतानाही न्यूझीलंडने सामन्याअखेर 273 धावा केल्या.
पहिल्या वनडे सामन्यात शतकी खेळी(109) करणाऱ्या टेलरने या सामन्यातही नाबाद 73 धावा केल्या. यानंतर सामना हाताबाहेर गेल्याचे कोहलीने कबूल केले. परिणामत: पुढे फलंदाजी दरम्यान भारतीय संघाला खूप संघर्ष करावा लागला.
भारताच्या फलंदाजीची सुरूवात संथ झाली. परंतु, श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीने (52) भारताचा डाव सांभाळला. याबरोबरच रविंद्र जडेजा आणि नवदीप सैनीने 8 व्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी रचली. अय्यर, जडेजा आणि सैनीच्या या योगदानाने कोहलीला प्रभावित केल्याचे त्याने सांगितले आहे. त्याचबरोबर त्याने सर्वांची प्रशंसा देखील केली आहे.
सैनीच्या फलंदाजीची प्रशंसा करत कोहली म्हणाला की, सैनी इतकी चांगली फलंदाजी करू शकतो हे आम्हाला माहित नव्हते. जर खालच्या फळीतील फलंदाज इतकी उत्तम फलंदाजी करत असतील तर ते मधल्या फळीतील आणि वरच्या फळीतील फलंदाजांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.
ऑक्टोबर 2020मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक सामना होणार आहे. त्यासंदर्भात बोलताना कोहली म्हणाला की, “यावर्षीच्या कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांच्या तुलनेत वनडे सामने अधिक महत्त्वाचे नाही. तरीही, या सामन्यामुळे दबाव असतानाही उत्तम फलंदाजी करणारे खेळाडू आम्हाला कळाले.” तसेच, अंतिम सामन्यात संघातील बदलांच्या वेळी याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल, असंही तो पुढे म्हणाला.
…आणि सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाची जर्सी घालून उतरला फलंदाजीला, पहा व्हिडिओ
वाचा- 👉 https://t.co/cWg5uP2VE4👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @sachin_rt— Maha Sports (@Maha_Sports) February 9, 2020
भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या टेलर-जेमिसनच्या त्या भागीदारीने मोडला २७ वर्षे जूना विक्रम
वाचा- 👉https://t.co/TJdwUTwH5z👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ @RossLTaylor— Maha Sports (@Maha_Sports) February 9, 2020