सेंच्युरियन । भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेत ३ सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरा सामना पराभूत झाला. यामुळे २५ वर्षांत प्रथमच आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकायच्या भारताच्या स्वप्नांना चांगलाच सुरुंग लागला.
मोठी अपेक्षा ठेवून संघ या दौऱ्यावर गेला होता. येवेळी भारतीय गोलंदाजीची भक्कम होती. परंतु फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.
भारतीय संघाने आजपर्यंत आफ्रिकेचे ७ दौरे केले असून त्यात ६ वेळा भारताचा मालिकेत पराभव झाला आहे तर २०१०-११ साली संघाने मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली होती.
भारतीय संघ आजपर्यंत आफ्रिकेत १९ कसोटी सामने खेळला असून त्यात संघाला १० पराभव, २ विजय पराभव पाहावे लागले आहेत तर ७ सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेतील आजपर्यंतचा इतिहास
१९९२-९३: भारत पराभूत ०-१
१९९६-९७:भारत पराभूत ०-२
२००१-०२:भारत पराभूत ०-१
२००६-०७:भारत पराभूत २-१
२०१०-११: मालिका अनिर्णित १-१
२०१३-१४: भारत पराभूत ०-१
२०१७-१८: भारत पराभूत ०-२ (एक सामना बाकी आहे)