आयसीसीस वनडे विश्वचषक सध्या रंगात आहे. उपांत्य फेरीतील पहिले तीन संघ निश्चित झाले असून शेवटच्या संगासाठी सामने खेळले जात आहेत. यजमान भारत विजेतेपदासाठी दावेदार मानला जात आहे. तसेच वनडे विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळायचा आहे. या मालिकेसंदर्भात महत्वाची माहिती सध्या समोर येत आहे.
आयसीसी वनडे विश्वचषक 2023चा (ICC ODI World Cup 2023) अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 23 नव्हेंबर 3 डिसेंबर यादरम्यान पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. माध्यमांतील वृत्तांनुसार विश्वचषक खेळणाऱ्या बहुतांश खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेतून विश्रांती मिळणार आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा देखील ही मालिका खेळताना दिसणार नाही, असे सांगितले जात आहे.
रोहित आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यासह हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह हेदेखील विश्रांतीवर अशण्याची शक्यता आहे. अशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारताचे नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर त्याचे उत्तर देखील मिळाले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार सूर्यकुमार यादव आणि ऋतुराज गायकवाड ही दोन नावे या मालिकेत कर्णधारपदासाठी चर्चेत आहेत. असे असले तरी, या दोघांमधील कोणाला प्रत्यक्ष कर्णधारपद निभावण्याची संधी मिळणार, हे येत्या काही दिवसांमध्ये अधिकृतपणे समजू शकते.
सूर्यकुमार यादव याने विश्वचषकात भारतासाठी महत्वपूर्ण धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात भारताने आशियाई गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. भारतीय संघाला 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. त्यानंतर तीन सामन्यांची वनडे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका देखील भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळली जाईल. या तिन्ही मालिका दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळल्या जाणार असून भारताला यासाठी भक्कम संघ सोबत घेऊन जावा लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्रांतीवर असणारे वरिष्ठ खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पुन्हा संघासोबत असतील, असेही सांगितले जात आहे.
हार्दिक पंड्या याला दुखापीमुळे विश्वचषक अर्ध्यात सोडावा लागला. वृत्तांनुसार हार्दिक ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपर्यंत फिट होऊ शकणार नाहीये. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसू शकतो. (India is likely to get a new captain in the T20I series against Australia)
महत्वाच्या बातम्या –
अंडर-19 आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारतीय संघ कोणत्या-कोणत्या तारखेला खेळणार
‘या’ भारतीय दिग्गजाला पाहायचाय भारत-पाकिस्तान उपांत्य फेरी सामना; म्हणाला, ‘यापेक्षा मोठा…’