---Advertisement---

अंडर-19 आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारतीय संघ कोणत्या-कोणत्या तारखेला खेळणार

u19 India
---Advertisement---

आशियाई क्रिकेट परिषदेने नुकतेच 19 वर्षांखालील आशिया चषक (पुरुष) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. यावर्षी ही स्पर्धात दुबईमध्ये आयोजित केली गेली आहे. पहिला सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाईल. तसेच भारताचा कट्टर प्रतिस्पर्धक पाकिस्तान संघ देखील या स्पर्धेक ऍक्शन मोडमध्ये असेल. पाकिस्तानचा सामना स्पर्धेच्या पहिल्याच दिवसी नेपाळ संघाविरुद्ध होईल.

आशियाई क्रिकेट परिषदेच्या माहितीनुसार एकूण आठ संघ आशिया चषक स्पर्धेच सहभागी होणार आहेत. यात भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, यूएई आणि जपाण या आठ संघांचा समावेश आहे. स्पर्धा दोन गटांमध्ये खेलवली जाईल. अ गटात भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे संघ आहेत. तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका, यूएई आणि जपान हे संघ एकमेकांशी भिडतील. 19 वर्षांखालील आशिया चषकाचे आयोजन 8 डिसेंबर ते 15 डिसेंबर यादरम्यान केले गेले आहे. स्पर्धेत एखूण 15 सामने खेळले जातील. दुबईतील तीन वेगवेगळ्या स्थानी म्हणझेच आयसीसी अकादमी – एक, आयसीसी अकादमी – दोन आणि दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमव याठिकाणी ही स्पर्धा खेळवली जाईल.

आशिया चषकाआधी 19 वर्षांखालील विश्वचषकाचे वेळापत्रक देखील जाहीर झाले होते. ही महत्वाची स्पर्धा पुढच्या वर्षी 13 जानेवारी ते 4 फेब्रुवारी यादरम्यान श्रीलंकेमध्ये आयोजित केली जाणार आहे. 19 वर्षांखालील विश्वचषकाचा हा 15 वा हंगाम असेल, ज्यामध्ये जगभरातील 16 संघ भाग घेतील. स्पर्धेच्या इतिहासात श्रीलंका संघाला तिसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. यावर्षी 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना यजमान श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला जाईल. तसेच गतविजेता भारत आपला पहिला सामना 14 जानेवारी रोजी बांगलादेश संघाविरुद्ध खेळेल. (U-19 World Cup schedule announced)

महत्वाच्या बातम्या – 
‘या’ भारतीय दिग्गजाला पाहायचाय भारत-पाकिस्तान उपांत्य फेरी सामना; म्हणाला, ‘यापेक्षा मोठा…’ 
बटलर होणार इंग्लंडच्या कर्णधारपदावरून पायउतार? ECB प्रमुख भारतात दाखल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---