---Advertisement---

हा दिग्गज म्हणतो, ही आहे टीम इंडियाची कमजोर कडी

On: शुक्रवार, जानेवारी 17, 2020 1:19 PM
---Advertisement---

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वाॅनने भारतीय क्रिकेट संघावर निशाना साधला आहे.  वॉन म्हणाले की मधल्या फळीतील कमकुवतपणा ही भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या आहे.

वाॅनने ट्वीट केले, ‘हे पाहणे रोमांचक असेल की दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघ कशाप्रकारे कामगिरी करतोय. जर भारताने विचार केला तर मागच्या दोन विश्वचषकात त्यांनी केवळ समाधानकारक कामगिरी केली आहे. माझ्या मते, इंजिन रूममध्ये म्हणजे, मधल्या फळीमध्ये ताकदीची कमी हे एक मोठे कारण आहे. विश्वचषकात यजमान संघ चॅम्पियन होण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी भारताकडे तीन वर्षे (पुढील विश्वचषकासाठी)आहेत.’

मंगळवारी मुंबईत झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताचा संपूर्ण संघ 49.1 षटकात 225 धावांवर बाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 37.4 षटकात  258 धावा करून सामना जिंकला.

भारताने 2013 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात आयसीसी विश्वचषक जिंकले होते. यानंतर भारतीय संघाला आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांचे विजेतेपद जिंकण्यात अपयश आले आहे.

भारतीय संघाला 2014 मध्ये टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. तसेच भारत विश्वचषक 2016 च्या टी20 आणि 2019 च्या वनडे विश्वचषकाच्या उंपात्य फेरीपर्यत पोहचू शकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---