भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जाणार आहे. सध्या हा विषय चर्चेत आहे. जो संघ ही मालिका जिंकेल, त्याची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC 2025 Final) मध्ये जाण्याची शक्यता वाढेल. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना (22 नोव्हेंबर) पासून पर्थमध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी भारत-ऑस्ट्रेलिया संघात ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शेवटचा कसोटी सामना कधी खेळला गेला होता आणि त्याचा निकाल काय लागला? याबद्दल जाणून घेऊया.
भारतीय संघाने गेल्या 4 वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एकही कसोटी सामना खेळला नाही. भारताने 2020-2021 मध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांमध्ये दोन्ही संघ प्रत्येकी 1-1 अशा बरोबरीत होते. चौथा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर झाला. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळलेला हा शेवटचा कसोटी सामना होता.
त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या, ज्यात मार्नस लॅबुशेनने (Marnus Labuschagne) 108 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात 336 धावा केल्या, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारतीय संघावर 33 धावांची आघाडी घेतली. यजमान ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 294 धावा केल्या, त्यामुळे भारतीय संघाला चौथ्या डावात 328 धावांचे लक्ष्य मिळाले.
328 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून शुबमन गिलने (Shubman Gill) 91 धावा केल्या आणि चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) 56 धावांचे योगदान दिले. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर भारतीय संघाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. पण झंझावाती शैलीत फलंदाजी करताना रिषभ पंतने (Rishabh Pant) 89 धावांची खेळी खेळली आणि भारताच्या 3 गडी राखून विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यावेळी भारताने इतिहास रचला. 28 वर्षात गाबा मैदानावर एखाद्या संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
बॉर्डर गावसकर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीच्या इतिहासातील भारताचे मोठे रेकाॅर्ड…!
शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल मोठे अपडेट..! कधी करणार पुनरागमन?
IND vs AUS: विराट कोहलीचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया कसोटी दौरा, माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी