भारसध्या भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये पाचवा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना वर्ल्ड टेसेट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने भारतासाठी अधिक महत्तवाचा आहे. याच कारणाने भारतीय खेळाडू या सामन्यात जिवाची बाजी लावताना दिसत आहेत. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्याने संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे गेले. सामन्याच्या पहिल्याच डावात भारतीय संघाने तब्बल १३२ धावांची आघाडी घेतली आहे.
India have obtained a solid first-innings lead.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/wMZK8kesdD pic.twitter.com/rl3yUljofd
— ICC (@ICC) July 3, 2022
या सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रात गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत केवळ ९८ धावांवर भारताचे ५ गडी बाद केले. मात्र, रिषभ पंत आणि रविंद्र जडेजाच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ४१६ धावांचा डोंगर रचला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाला पहिले तीन झटके कर्णधार बुमराहने दिले.
त्यानंतर जो रुट, जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र, सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. सिराजने या सामन्यात भारतासाठी सर्वाधिक ४ बळी घेतले. त्यापाठोपाठ बुमराहने ३ शामीने २ तर शार्दूल ठाकूरने १ बळी घेतला. यादरम्यान इंग्लंडच्या संघासाठी बेयरस्टोने सर्वाधिक १०६ धावा केल्या.
दरम्यान, भारताच्या दुसऱ्या डावाला आता सुरुवात झाली असून पहिल्याच षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारताला पहिला झटका देत सलामीवीर शुभमन गिलचा बळी घेतला. या डावात आता भारतीय चाहत्यांना विराट कोहली कडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारताच्या वेगवान गोलंदाजांनी रचलाय इतिहास, कसोटी मालिकेत पहिल्यांदाच घेतल्या ‘एवढ्या’ विकेट्स
Video: बेयरस्टोला पवेलियनमध्ये धाडताच विराट झाला भलताच खूष, कॅमेरात कैद झाला क्षण
पीवायसी रावेतकर फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत सामुराईज, टायटन्स, निंजाज संघांचे विजय