टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात खेळला गेला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांनी जबरदस्त फटकेबाजी करत झिम्बाब्वेसमोर भलेमोठे आव्हान उभे केले. यावेळी भारताकडून दोन खेळाडूंनी अर्धशतके झळकावली.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान भारताने निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 186 धावा चोपल्या. तसेच, झिम्बाब्वेपुढे 187 धावांचे आव्हान ठेवले.
Innings Break!
Half-centuries from @surya_14kumar (61*) & @klrahul (51) as #TeamIndia post a total of 186/5 on the board.
Scorecard – https://t.co/lWOa4COtk9 #INDvZIM #T20WorldCup pic.twitter.com/XxXJ4FMxyk
— BCCI (@BCCI) November 6, 2022
भारताचा डाव
भारतीय संघाने 186 धावा चोपल्या. या धावा करताना भारतीय फलंदाजांपैकी दोन खेळाडूंनी वादळी खेळी साकारली. रोहित शर्मा (Rohit Shrma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी डावाची सुरुवात केली होती. मात्र, रोहित शर्मा लवकर बाद होऊन तंबूत परतला. त्याने यावेळी फक्त 15 धावांचे योगदान दिले. त्याच्यानंतर राहुलने डाव सावरला आणि धावफलक हलता ठेवला. त्याने या सामन्यात अर्धशतक झळकावले. हे त्याचे टी20 विश्वचषकातील सलग दुसरे अर्धशतक होते. त्याने यावेळी 51 धावांची खेळी केली. यामध्ये 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला मिळाला. त्याने 25 चेंडूत 61 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 4 षटकार आणि 6 चौकारही मारले. या दोघांव्यतिरिक्त विराट कोहली (26), हार्दिक पंड्या (18) आणि रोहित शर्मा (15) यांनी दोन आकडी धावसंख्या पार करत संघाच्या धावसंख्ये मोलाचे योगदान दिले. दिनेश कार्तिकच्या जागी संधी मिळालेल्या रिषभ पंत याला या सामन्यात फक्त 3 धावा करता आल्या.
झिम्बाब्वेकडून गोलंदाजी करताना चार गोलंदाजांना विकेट्स घेण्यात यश आले. शॉन विलियम्स याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 2 षटकात 9 धावा देत 2 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याच्याव्यतिरिक्त सिकंदर रझा, ब्लेसिंग्स मुझरबानी आणि रिचर्ड नगारवा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केएल राहुलच्या शिरपेचात मानाचा तुरा! अर्धशतक ठोकताच ‘या’ विक्रमात बनला तिसरा भारतीय
‘हा पराभव गळ्याखाली घालणे कठीण…’, विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर बावुमाने ‘या’ गोष्टीला दिला दोष