कोलकाता | येथे चालू असलेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला मोठा झटका बसला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आपल्या वनडे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३१ वे शतक करता करता राहिला.
विराटने १०७ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ९२ धावा केल्या. विराट ६ व्यांदा वनडे सामन्यात ९० च्या घरात बाद झाला आहे. भारत आता २०९ धावात ६ बाद अश्या स्थितीत आहे. भारताचा गोलंदाज व सध्या फलंदाज म्हणून नाव मिळवलेला भुवनेश्वर कुमार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मैदानावर खेळत आहेत.
विराटाचे जर हे शतक झाले असते तर त्याने ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडत सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली असती.
आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधील विराटाचे हे ४८वे शतक असले असते आणि त्याने महान फलंदाज राहुल द्रविडच्या विक्रमाचीही बरोबरी केली असती.