सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला टी२० सामना सुरू आहे. या सामन्यात पहिले फलंदाजी करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा १४ चेंडूत २४ धावा काढुन बाद झाला. कोरोनाची लागण झाल्यानंतर रोहित पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यामुळे त्याच्या कडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, मोईन अलीच्या शानदार गोलंदाजीपुढे रोहितने गुडघे टेकल्याचे दिसून आले.
On his 50th IT20 appearance Mo gets the big one!
Scorecard & Videos: https://t.co/r1PBlKZPnh
???????????????????????????? #ENGvIND ???????? pic.twitter.com/zKISurerGO
— England Cricket (@englandcricket) July 7, 2022
रोहितने या सामन्यात सुरुवातीपासूनच फटकेबाजी करायला सुरुवात केली होती. त्याने या तडाखेबाज खेळीत ५ चौकार लगावले. मात्र मोइन अलीने आपल्या गोलंदाजीवर रोहितला यष्टीरक्षक जोस बटलरला झेल देण्यास भाग पाडत भारताला पहिला झटका दिला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यामुळेच रोहित शर्मा, इशान किशन आणि त्यानंतर दिपक हुड्डा यांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली.
दरम्यान, सामन्यात नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पहिल्याच सामन्यात रोहितनं केली निराशा! तिसऱ्या षटकांत मोईने अलीने दिला भारताला मोठा झटका
अखेर अर्शदीपला संधी मिळालीच! इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात पदार्पण करण्यास सज्ज
भारताच्या स्टार टेनिसपटूबाबत मोठी बातमी! बहुतेक करियरला पण ‘फुलस्टॉप’