केपटाऊन। भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराच्या रूपाने तिसरा बळी गमावला आहे.
पुजाराला ४ धावांवर असताना मोर्ने मॉर्केलने यष्टीरक्षक क्विंटन डिकॉककडे झेल देण्यास भाग पाडले. पुजारा हा मॉर्केलचा या डावातील दुसरा बळी ठरला. याआधी त्याने सलामीवीर शिखर धवनला १६ धावांवर बाद केले आहे.
याबरोबरच मुरली विजयही आज लवकर बाद झाला त्याला व्हर्नोन फिलँडरने बाद केले. त्यामुळे भारत अडचणीत सापडला आहे.
भारताला हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने २०८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या भारतीय संघ १५ षटकात ३ बाद ५२ धावांवर खेळत आहे. भारताला हा सामना जिंकण्यासाठी अजून १५६ धावांची गरज असून विराट कोहली आणि रोहित शर्मा नाबाद खेळत आहेत.