सेंच्युरियन । भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत २-० असा पराभव स्वीकारला आहे. या मालिकेतील १ सामना अजूनही बाकी आहे.
भारतीय संघ १ जानेवारी २०१५ पासून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ३२ कसोटी सामने खेळला असून त्यात केवळ २ सामन्यात संघ पराभूत झाला होता. परंतु १ जानेवारी २०१८ पासून केवळ १७ दिवसांत संघाला दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
गेल्या ३ वर्षांत भारतीय संघाने कधीही कसोटी मालिका गमावली नव्हती. परंतु मालिकेतील पहिले दोन सामने पराभूत होऊन भारतीय संघाच्या नावावर नकोसा विक्रम जमा झाला आहे.