भारतीय संघ नव्या वर्षाचे स्वागत घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळून करणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला मुंबईमध्ये खेळला जाणार आहे. रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत भारत ही मालिका हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.या मालिकेसंबधित काही विक्रमे पाहुया ज्यामुळे पाहुणा संघ वरचढ की नाही हे कळेल. कारण श्रीलंकेने आशिया चषक 2022 जिंकण्याची कामगिरी केली आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पहिली टी20 मालिका सर्वप्रथम 2009मध्ये खेळली गेली. कोलंबो येथे झालेल्या त्या सामन्यात भारत जिंकला होता. त्यानंतर भारतात दोन सामन्यांची मालिका खेळली गेली. त्यातील पहिला सामना श्रीलंकेने आणि दुसरा सामना भारताने जिंकला. या दोन्ही संघात भारतामध्ये आतापर्यंत 14 टी20 सामने खेळले गेले. यातील 11 सामने भारताने आणि दोन सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे श्रीलंकेने भारताला भारतात 2016मध्ये पराभूत केले होते.
2022मध्येही श्रीलंका भारताच्या दौऱ्यावर आला होता आणि तीन सामन्यांची टी20 मालिका खेळला होता. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारताने ती मालिका 3-0 अशी जिंकली होती. यातील पहिला सामना भारताने 62 धावांनी जिंकत मालिकेत आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 7 विकेट्सने आणि तिसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने श्रीलंकेचा पराभव केला होता.
आता भारत श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर विजयात सातत्य राखण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या मालिकेतील दुसरा टी20 सामना 5 जानेवारीला पुणे आणि तिसरा सामना 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळले जाणार आहेत. या मालिकेनंतर भारत श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. यामध्ये भारताचे कर्णधारपद पुन्हा एकदा रोहित शर्माकडे दिले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी व मुकेश कुमार.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामन्यादरम्यान पंतच्या अपघाताची बातमी ऐकून ईशान निशब्द! प्रतिक्रियेचा व्हिडिओ व्हायरल
क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे प्रेमाच्या पिचवरही ‘लांबा’ आघाडीवरच राहिले! वाचा बेधडक ‘रॅम्बो’ची जीवनकहाणी