केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाला दोन झटके लवकर बसले आहेत. भारताचे दोन्ही सलामीवीर ३० धावातच माघारी परतले आहेत. त्यामुळे आता भारतावरचा दबाव वाढत आहे.
भारताकडून दुसऱ्या डावाची सुरुवात मुरली विजय आणि शिखर धवनने संयमी केली होती. परंतु शिखरला २० चेंडूत १६ धावांवर असताना मोर्ने मॉर्केलने झेलबाद केले. शिखरचा झेलही मॉर्केलनेच घेतला.
तसेच विजयला दक्षिण आफ्रिकेने रिव्ह्यू घेतल्यानंतर दोन वेळा जीवदानही मिळाले होते. परंतु त्याला याचा फायदा घेता आला नाही. तोही ३२ चेंडूत १३ धावांवर झेलबाद झाला. एबी डिव्हिलियर्सने थर्ड स्लिपमध्ये व्हर्नोन फिलँडरच्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला.