भारतीय हॉकी संघ 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी तयारी करत आहे. यासाठी भारताचा 19 सदस्यीय संघ सराव सामन्यांसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाला आहे. तेथे ते ऑलिम्पिक 2024 साठी मानसिक शक्ती आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी सराव करतील. संघ तेथे काही सराव सामनेही खेळणार आहे.
आता पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारतीय हॉकी संघाच्या अधिकृत जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे. भारतीय पुरुष हॉकी संघानं 6 जुलै रोजी बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) कॅम्पसमध्ये पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी आपल्या अधिकृत जर्सीचं अनावरण केलं. खेळाडूंनी ऑलिम्पिक रिंगसमोर ही जर्सी परिधान करून पोझ दिली. यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन, कर्णधार हरमनप्रीत सिंग, स्ट्रायकर मनदीप सिंग यासह इतर खेळाडू उपस्थित होते.
Unveiling their Olympic spirit! 🇮🇳🏑
Captained by Harmanpreet Singh, our Men’s Hockey Team proudly dons the Paris 2024 jersey at SAI Bengaluru. After an intense camp, they’re off to Switzerland for mental toughness training and practice matches in the Netherlands.… pic.twitter.com/zG5AYlusoV
— Hockey India (@TheHockeyIndia) July 6, 2024
भारतीय पुरुष हॉकी संघाचा ऑलिम्पिक इतिहास गौरवशाली आहे. टीम इंडियानं आतापर्यंत 12 ऑलिम्पिक पदकं जिंकली आहेत, ज्यामध्ये 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. यावेळीही हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघ पुन्हा एकदा पदक जिंकण्याच्या उद्देशानं मैदानात उतरणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा 26 जून रोजी करण्यात आली होती. संघात 16 मुख्य खेळाडू आणि तीन राखीव खेळाडूंचा समावेश आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे –
गोलरक्षक – पीआर श्रीजेश
बचावपटू – जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुमित, संजय
मिडफिल्डर – राजकुमार पाल, समशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद
फॉरवर्ड – अभिषेक, सुखजित सिंग, ललित उपाध्याय, मनदीप सिंग, गुरजंत सिंग
राखीव खेळाडू – नीलकंठ शर्मा, जुगराज सिंग, कृष्ण बहादूर पाठक
महत्त्वाच्या बातम्या –
आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, या 15 खेळाडूंना मिळालं टीममध्ये स्थान
पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा एकतर्फी पराभव! युवराज-भज्जी सारखे दिग्गज सपशेल अपयशी
हा पराभव टीम इंडिया कधीच विसरणार नाही, झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाच्या नावे अनेक लाजिरवाणे विक्रम