डब्लिन। भारतीय संघाने 27 जूनला पार पडलेल्या आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 76 धावांनी विजय मिळवत आयर्लंड-इंग्लंड दौऱ्याची शानदार सुरुवात केली.
हा सामना भारताचा १००वा टी२० सामना होता. भारतीय संघाने यापैकी ६२ सामन्यात विजय मिळवला असून ३५ सामन्यात पराभव, एक सामना टाय तर २ सामन्यात कोणताही निकाल लागला नाही.
१०० टी२० सामने खेळल्यावर सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आता भारताच्या नावावर झाला आहे. यापुर्वी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेने १०० टी२० सामन्यात प्रत्येकी ५९ विजय मिळवले होते.
जगात आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये जिंकण्याची टक्केवारी सर्वाधिक असलेल्या संघात भारत दुसऱ्या स्थानावर आहे. ६६ सामन्यात ४४ विजय मिळवणारा अफगाणिस्तान या टक्केवारीत अव्वल आहे.
१००व्या सामन्यानंतर सर्वाधिक विजय मिळवणारे संघ
६३- भारत
५९- पाकिस्तान
५९- दक्षिण आफ्रिका
५३- आॅस्ट्रेलिया
५२- श्रीलंका
५२- न्युझीलंड
४८- इंग्लंड
महत्त्वाच्या बातम्या:
–टी२०मध्ये ६ हजार धावा करणारा शिखर धवन ६वा भारतीय
-क्रिकेटमधील भागीदारीच नाव घ्याल तर रोहित शर्मा-शिखर धवन जोडीला तोड नाही
-१२ महिन्यात एकही वनडेत संधी न मिळालेला भारतीय गोलंदाज विश्वचषकासाठी आशावादी






