भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ 1 विकेट गमावत 62 धावांच्या आघाडीसह फलंदाजीला उतरला होता. यावेळी भारताच्या रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी झटपट विकेट्स गमावल्या. त्यांचे 4 फलंदाज तर एकाच धावसंख्येवर तंबूत परतले. यावेळी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 31.1 षटकात 113 धावांवर संपुष्टात आला.
ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ट्रेविस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 46 चेंडूत 43 धावा केल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 6 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त मार्नस लॅब्युशेन याने 35 धावांचे योगदान दिले. यावेळी इतर एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडाही पार करता आला नाही. लॅब्युशेन, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकाँब आणि कर्णधार पॅट कमिन्स हे चार खेळाडू 95 धावसंख्येवर बाद झाले.
भारताकडून यावेळी गोलंदाजी करताना रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) पुन्हा चमकला. त्याने यादरम्यान सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तसेच, कसोटी कारकीर्दीतील विकेट्सचे 12वे पंचकही पूर्ण केले. त्याच्यासोबतच, आर अश्विन (R Ashwin) यानेही 3 विकेट्स नावावर केल्या.
भारतापुढे 115 धावांचे आव्हान
भारतीय संघाला दुसरा सामना जिंकण्यासाठी 115 धावांचे आव्हान पार करावे लागणार आहे. विशेष म्हणजे, हा सामना जिंकण्यासाठी भारताच्या हातात आणखी दोन दिवस आहेत. त्यामुळे हे आव्हान भारतीय संघ सहजरीत्या पार करण्याची शक्यता आहे. भारतीय संघ 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0ने आघाडीवर आहे. आता भारताने हा सामना जिंकला, तर भारत मालिकेत आणखी एक आघाडी घेईल. तसेच, भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे.
Ravindra Jadeja was the star of the show as India bowl out Australia for 113.
Can the hosts chase down 115?#WTC23 | #INDvAUS | 📝 https://t.co/HS93GIyEwS pic.twitter.com/dnjs4pI4ig
— ICC (@ICC) February 19, 2023
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
तत्पूर्वी पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 263 धावांवर संपुष्टात आला होता. त्यांच्याकडून उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 81 धावांचे योगदान दिले होते. तसेच, पीटर हँड्सकाँब यानेही नाबाद 72 धावा कुटल्या होत्या. त्यांच्याव्यतिरिक्त कर्णधार कमिन्स (33) याला वगळता इतर एकाही फलंदाजाने 20 धावांचा आकडा पार केला नव्हता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ माजी कर्णधाराच्या IPL कारकीर्दीला लागणार पूर्णविराम, सीएसकेच्या दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
जन्मभूमी दिल्लीत विराट खेळतोय अखेरचा कसोटी सामना? फक्त दोन दिवस आणि वर्षभराची मेहनत पणाला