---Advertisement---

हुश्श! भारतीय संघ आता सेमिफायनलमध्ये पोहचणार, फक्त करावे लागेल ‘हे’ सोपे काम

On: सोमवार, ऑगस्ट 1, 2022 1:48 PM
Pooja-Vastrakar-Renuka-Singh-Dipti-Sharma
---Advertisement---

कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या हंगामात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्यांनी आतापर्यंत दोन सामने जिंकले. भारताने दोन सामने खेळले असून त्यांना एकामध्येच विजय मिळवता आला आहे. त्यामुळे भारताला उपांत्य फेरीत पोहोचायचे असेल तर पुढील सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे.

भारत या स्पर्धेत हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. पाकिस्तानला पराभूत केल्यावर भारताचा पुढील सामना बार्बादोसशी होणार आहे. हा सामना ३ ऑगस्टला खेळला जाणार आहे. बार्बादोस हा संघ मुळचा वेस्ट इंडिज संघाशी संबधित आहे. या स्पर्धेत ते हीली मॅथ्यूजच्या नेतृत्वाखाली खेळत आहेत. त्यांनी २ सामने खेळले असून एक सामना जिंकला तर एकामध्ये ते पराभूत झाले.

अ गटात भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बार्बादोस यांचा समावेश आहे. चारही संघानी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने साखळी फेरीतील दोन्ही सामने जिंकले. यामुळे त्यांनी ४ गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. तसेच ते उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.

बार्बादोस आणि भारत संघांचे प्रत्येकी दोन गुण आहेत. तर भारताचा नेट रनरेट चांगला आहे. तसेच या स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाने एकही सामना जिंकला नाही. त्यांना बार्बादोसने पहिल्याच सामन्यात पराभूत केले होते. भारतीय संघाला जर उपांत्य फेरीत जागा निश्चित करायची असेल तर त्यांना बार्बादोस विरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे. तसेच पाकिस्तानचा संघ या शर्यतीतून केव्हाच बाहेर झाला आहे.

रविवारी (३१ जुलै) भारताने पाकिस्तान संघाचा ८ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात सलामीवीर स्म्रीती मंधानाने ४२ चेंडूत नाबाद ६३ धावा केल्या. पावसामुळे हा सामना १८-१८ षटकांचा झाला. पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. भारताच्या प्रभावी गोलंदाजीसमोर त्यांनी ९९च धावा केल्या. तर हे लक्ष्य भारताने ११.४ षटकात २ विकेट्स गमावतच पार केले. भारताला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्सने पराभूत कले होते.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये प्रथमच महिला क्रिकेटचा (Cricket In Commonwealth Games) सहभाग करण्यात आला आहे. या स्पर्धेतील क्रिकेटचे सर्व सामने टी२० प्रकारमध्ये एजबस्टन येथेच खेळले जात आहेत. यामुळे यातील फक्त साखळी सामन्यांसाठी हायब्रिड खेळपट्टी वापरली जात आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

मोईनला बाद करण्यासाठी स्टब्सचा अफलातून झेल, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

विंडीज संघाचा रडीचा डाव! सामना जिंकण्यासाठी बदलले ठिकाण? वाचा खरे कारण

एकट्या शम्सीने उडवला अख्ख्या इंग्लंडचा धुव्वा! सामना जिंकत मालिका खिशात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---