---Advertisement---

भावा, विराटने टी२० विश्वचषक खेळलाच पाहिजे! भारताच्या दिग्गजाने बोलून दाखवलेच

On: शनिवार, जुलै 23, 2022 5:09 PM
Virat-Kohli
---Advertisement---

विराट कोहली क्रिकेट विश्वातील महत्वाचे नाव. सध्या तो त्याच्या कारकिर्दीच्या खराब फॉर्ममधून जात आहे. अशी स्थिती असताना त्याला संघातून बाहेर काढले जावे असे मत काही आजीमाजी खेळाडूंनी मांडले आहेत. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर अनेकांनी टिका केल्या आहे. तर काहींनी त्याची पाठराखण केली आहे. आता यामध्ये एक नाव अजून जोडले गेले आहे ते म्हणजे अजित आगरकरचे. त्याने विराट टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात असणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे.

विराटला संघातून वगळ, हे माजी अष्टपैलू कपिल देव (Kapil Dev) यांनी सर्वात आधी म्हटले होते. मात्र त्यानंतर जे काही टिकांना जोर धरला आहे तो अजून काही थांबला नाही. कपिल यांच्यानंतर पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडच्या काही आजीमाजी खेळाडूंनीही विराटवर टिका केली. यावर काहींनी त्याची बाजूही घेतली आहे. यावरून अजित आगरकर म्हणतो, “नाही, विश्वचषकासारख्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाला विराटची गरज आहे. त्याच्या सारखा महान क्रिकेटपटू अधिक काळ आउट ऑफ फॉर्म राहत नाही.”

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात विराट कोहली (Virat Kohli) याला विश्रांती देण्यात आली आहे. तसेच तो एक महिन्याच्या रजेवर आहे. तो लयीत लवकर परतावा यासाठी संघनिवडकर्ते त्याला झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेत खेळवण्याचा विचार करत आहेत.

विराटला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि दीपक हुड्डा (Deepak Hooda) यांच्याकडून कडवी प्रतिस्पर्धा मिळत आहे. या दोघांनीही मागील मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये विशेष कामगिरी करत शतके झळकावली आहेत. तर दुसरीकडे विराट यावर्षी फक्त ४ टी२० सामने खेळला आहे. तसेच आगामी टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये खेळला जाणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट बोर्ड संघ तयार करण्यामध्ये व्यस्त आहे. नुकतेच खेळल्या गेलेल्या अनेक टी२० सामन्यांमधून युवा खेळाडूंनी पदार्पण केले आहे.

“ऑस्ट्रेलियामध्ये त्याला अनुभव आहे. भारतीय संघाच्या २ विकेट्स पडल्या तर तेथे विराटची गरज भासणार आहे. त्याला दबावात कसा खेळ करायचा हे चांगले माहित आहे,” असेही अजित पुढे म्हणाला आहे.

अजित बरोबरच भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, बीसीसीआयचे (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याच्या बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनीही तो लवकरच लयीत परतणार अशा आशा व्यक्त करत त्याची पाठराखण केली आहे.

क्रिकेटच्या १४ वर्षाच्या कारकिर्दीत विराटने ४६३ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७० शतकांसह २३७२६ धावा केल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडविरुद्ध दारूण पराभव; अवघ्या ८३ धावांत उडाली दाणादाण

क्रिकेटपटूंपाठोपाठ आता भारतीय पंचही होणार मालामाल! एका दिवसाचे मिळणार तब्बल इतके हजार

वेस्ट इंडीजविरुद्धच्या लाईव्ह सामन्यात कर्णधार धवनने केले ‘हे’ कृत्य, समालोचकांच्याही बत्त्या गुल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---