शुक्रवारी (10 सप्टेंबर) भारत आणि बांगलादेश संघ आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीत आमने सामने आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर बांगलादेशला या सामन्यात प्रथम फलंदाजी करावी लागली. भारतीय गोलंदाजांनी अगदी पहिल्यापासून बांगलादेशवर वर्चस्व बनवले. पण कर्णधार शाकिब अल हस याच्या महत्वपूर्ण अर्धशतकामुळे बांगलादेश संघ 50 षटकात 265 धावांपर्यंत मजल मारू शकला. यादरम्यान त्यांच्या 8 खेळाडूंनी विकेट्स गमावल्या. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने भारतासाठी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्सच्या नुकसानावर 50 षटकांमध्ये 265 धावा केल्या. यात कर्णधार शाकिब अल हस याने सर्वाधिक 80 धावांचे योगदान दिले. यासाठी शाकिबने 85 चेंडू खेळले, ज्यामध्ये 6 चौकार आणि 3 षटकार मारले. तौहीद ह्रदोय याने सहाव्या क्रमांकावर खेळताना 81 चेंडूत 54 धावांची खेळी केली.
गोलंदांचा विचार केला, तर शार्दुल ठाकूर याने 10 षटकांमध्ये 65 धावा खर्च केल्या. पण संघासाठी सर्वात किफायतशीर गोलंदाज देखील शार्दुलच ठरला. कारण त्यानेच फॉर्मात असलेल्या शाकिब आणि इतर दोन फलंदाजांना बाद केले. मोहम्मद शमी याने 8 षटकांमध्ये 32 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (India needs 266 runs to continue their unbeaten run in Asia Cup 2023)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
बांगलादेश – लिटन दास (यष्टीरक्षक), तंजीद हसन, अनमूल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तंजीम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.
महत्वाच्या बातम्या –
फिल्डर म्हणून रोहितने केला मोठा विक्रम, विराट टॉपर असणाऱ्या खास यादीत मिळवले स्थान
IND vs BAN! रोहितकडे सचिनचा महारेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी, कराव्या लागतील फक्त ‘एवढ्या’ धावा