दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजिनामा दिला आहे. यानंतर एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे कसोटी संघाचा कर्णधार कोण असणार? यातच भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटले आहे की हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहीत शर्मा (Rohit Sharma) ला पुर्णवेळ कसोटी कर्णधार (New Test Captain) बनवायला हवे.
रोहित शर्माला गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणुन नियुक्त केले होते. तसेच तो एकदिवसीय संघाचा कर्णधार सुद्धा आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार गतवर्षी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. म्हणून दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी केएल राहुलला उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आले होते.
व्हिडिओ पाहा- आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener
भावी कसोटी कर्णधारावर रवी शास्त्री म्हणाले की, “जर रोहित तंदुरुस्त आहे, तर तो कसोटीतही कर्णधार का होत नाही? रोहितला दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी उप-कर्णधार म्हणुन नियुक्त केले होते. पण दुखापतीमुळे तो जावु शकला नाही. त्याला उप-कर्णधार बनवले तर त्याला कर्णधारपदी बढती का दिली जाऊ शकत नाही?”
रोहित शर्मा सर्व प्रकारांमध्ये भारताचे नेतृत्व करू शकतो, तो सध्या ३४ वर्षांचा आहे आणि भारत भविष्यात नेतृत्वाच्या भूमिकेसाठी तरुण खेळाडू तयार करण्याचा विचार करत आहे आणि या पदासाठी शास्त्री रिषभ पंतचीही अपेक्षा करत आहेत.
शास्त्री पुढे म्हणाले की, निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन भविष्यात कर्णधारपदावर चर्चा करताना २४ वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला विचारात घेवू शकतात. यावर बोलताना रवि शास्त्री म्हणाले, “रिषभ एक जबरदस्त युवा खेळाडू आहे. एक प्रशिक्षक म्हणुन तो माझा आवडता खेळाडू आहे. त्याच्याबद्दलची चांगली गोष्ट म्हणजे तो नेहमी तुमचे ऐकत असतो. काही लोकांचे असे मत आहे की, तो नेहमी त्याला पाहिजे ते करत असतो, पण हे खरे नाही. तो खेळाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो आणि संघासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे संघाच्या नेतृत्वासाठी त्याला नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.”
तसेच विराटबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, “विराट अजूनही २ वर्ष कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळू शकला असता, पण त्याने या पदाचा राजिनामा दिला. त्याच्या निर्णयाचे आपण स्वागत केले पाहिजे.”
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! स्मृतीने उंचावली भारताची मान! ठरली २०२१ ची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू
हाथ आया पर मुंह न लगा! पहिलीच वनडे मालिका गमावल्यानंतर कर्णधार राहुलने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
दक्षिण आफ्रिकेत भारताने केली निराशा, तरीही प्रशिक्षक द्रविडने घेतली राहुलसेनेची बाजू; म्हणाले…
हेही पाहा-