भारत विरुद्ध पाकिस्तान सामने पाहण्यासाठी जगभराचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. हे दोन्ही संघ आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) स्पर्धांव्यतिरिक्त कोणत्याच द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. पाकिस्तानचे खेळाडू इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्याच हंगामात खेळले होते. नंतर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. आता दोन्ही संघाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच आपण पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांचे खेळाडू एकत्र खेळताना पाहण्याचा आनंद अनुभवणार आहोत.
भारत आणि पाकिस्तान (India & Pakistan) हे २०२३मध्ये एकत्र खेळताना दिसणार आहेत. आयपीएल २०२३ नंतर आफ्रिका एलेवन आणि एशिया एलेवन यांच्यात मालिका खेळली जाणार आहे. एशिया एलेवनकडून भारत, पाकिस्तान बरोबरच श्रीलंका आणि बांगलादेश या दोन संघाचे खेळाडूही खेळताना दिसणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान २०१२-२०१३ नंतर आयसीसी व्यतिरीक्त कोणतेच सामने झाले नाहीत.
याआधी एशिया एलेवन (Asia XI) विरुद्ध आफ्रिका एलेवन (Africa XI) यांच्यात २००७मध्ये मालिका झाली होती. या मालिकेत तीन वनडे सामने खेळले गेले होते. यामध्ये एशिया संघाने आफ्रिका संघाला क्लीन स्विप केले होते. या मालिकेला आफ्रो-एशिया कप असेही म्हणतात.
एशिया एलेवन आणि आफ्रिका एलेवन संघात २००७मध्ये तीन सामन्यांची मालिका खेळली गेली होती. ही मालिका एशिया एलेवनने ३-०ने जिंकली होती. या सामन्यात एशिया एलेवन एमएस धोनी, युवराज सिंग, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद युसुफ हे खेळाडू होते. आफ्रिका एलेवनकडून एबी डिवीलियर्स, मोर्ने मोर्केल, मार्क बाउचर आणि शॉन पोलक हे खेळले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे राजनैतिक संबंध ताणल्यामुळे ही मालिका पुन्हा खेळली गेली नाही.
भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंचा समावेश असलेली मालिका २०२३मध्ये टी२० क्रिकेटच्या स्वरूपात खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष सुमोद दामोदर हे एप्रिलमध्ये याविषयी एक चर्चासत्र ठेवणार आहे.
“भारत आणि पाकिस्तानच्या स्टार खेळाडूंना एकत्र खेळताना पाहण्याची आमची योजना आहे. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्याचा विचार करत आहोत. असे झाले तर ही मालिका थरारक होईल. आमचे खेळ आणि राजनीती एकमेंकापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न असणार आहे,” असे दामोदर म्हणाले आहेत.
“भारत आणि पाकिस्तान संघातील खेळाडूंना एकत्र खेेळताना पाहून त्यांच्यातील नाते एकजुटीचे आहे हे सिद्ध होईल. अशा कामासाठी उत्तेजन देत ते अधिक घट्ट करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,” असे दामोदर पुढे म्हणाले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डने या मालिकेची तारीख पक्की केली तर क्रिकेट चाहत्यांसाठी आयपीएलनंतर मोठी मेजवाणीच ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो चांगला खेळाडू कस काय?’ पंतच्या खेळावर बॉलिवुड अभिनेत्याने उचलले प्रश्नचिन्ह
दौऱ्यापूर्वी लक्ष्मण यांनी दिला भारतीय संघाला मोलाचा संदेश, बीसीसीआयने फोटो केले शेअर
दुखापतीतून सावरल्यानंतर रवींद्र जडेजा नवीन सुरुवात करण्यासाठी तयार, शेअर केला खास फोटो