भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामने हे जगातील कोणत्याही दोन संघात होणाऱ्या सामान्यांपेक्षा जास्त पहिले जातात. या दोन देशांमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्यांची चाहते चातकाप्रमाणे वाट पाहत असतात.
गेल्या काही वर्षांपासून भारताने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तनबरोबर क्रिकेट खेळणे पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे या दोन देशांत गेले कित्यके वर्ष कोणतीही कसोटी किंवा एकदिवसीय मालिका खेळविण्यात आली नाही. परंतु आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये या दोन देशांना आमने- सामने यावं लागत.
इंग्लंडमध्ये सध्या सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हे दोन आमने-सामने आले होते. त्यात भारताने बाजी मारली. आता अंतिम सामन्यातही हे दोन देश पुन्हा समोरासमोर आले आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान कायमच भारताला वरचढ ठरले आहे. १९७८ सालापासून भारत पाकिस्तानमध्ये १२८ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यात पाकिस्तानला ७२ तर भारताला ५२ विजय मिळाले आहेत. ४ सामन्यातकोणताही निकाल लागला नसून एकही सामना टाय झालेला नाही. यात भारताचं जिंकायचं % आहे ४१.९३% तर पाकिस्तानच ५८.०६%
जरी एकदिवसीय सामन्यात भारताची पाकिस्तान विरुद्ध कामगिरी चांगली राहिलेली नसेल तरी आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये कायमच भारताचे वर्चस्व राहिले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी, टी२० विश्वचषक आणि ५० षटकांचा विश्वचषक यात १५ सामन्यात भारताने १३ तर पाकिस्तानने २ सामन्यात विजय मिळवला आहे. यातील भारताचे दोनही पराभव हे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झालेले आहेत.
एकदिवसीय स्पर्धांच्या अंतिम फेरीत कायमच पाकिस्तानच वर्चस्व राहील आहे. आजपर्यंत हे दोन देश अंतिम फेरीत १० वेळा आमने-सामने आले असून पाकिस्तानने ७ तर भारताने ३ वेळा विजय मिळवला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना उद्या ३ वाजता खेळवला जाणार आहे.