---Advertisement---

जयस्वाल की जय! एशियन गेम्समध्ये ठोकले वादळी शतक, रिंकूचाही जलवा

---Advertisement---

चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये मंगळवारी (3 ऑक्टोबर) क्रिकेट सामन्यांच्या उपांत्यपूर्व फेरीला सुरुवात झाली. यामध्ये भारतीय संघाचा सामना नेपाळविरुद्ध झाला. भारतीय संघाने शानदार फलंदाजी करत 202 धावा उभ्या केल्या. सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने भारतीय संघासाठी शानदार शतक झळकावले.

थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याची संधी मिळालेल्या भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजांना मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर कर्णधार ऋतुराज गायकवाड 23 चेंडूंमध्ये 25 तर तिलक वर्मा 10 चेंडूंवर दोन धावा करून बाद झाले. जितेश शर्मा देखील केवळ पाच धावांचे योगदान देऊ शकला. मात्र, मागील दोन वर्षांपासून शानदार फॉर्ममध्ये असलेल्या यशस्वी जयस्वाल याने संधी साधली.

त्याने नेपाळच्या गोलंदाजांवर आक्रमण करत 49 चेंडूंमध्ये 8 चौकार व 7 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. त्याला शिवम दुबे याने 25 धावा करत साथ दिली. रिंकू सिंग याने अखेरीस आपला फिनिशर अवतार दाखवत 15 चेंडूत 37 धावा कुटल्या. यासह भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांमध्ये चार बाद 202 धावा उभ्या केल्या.

(India Post 202 In Asian Games Against Nepal Yashasvi Jaiswal Hits 100)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---