भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना ॲडीलेड येथे पार पडला. पहिल्या सामन्यात सुरुवातीचे दोन दिवस आघाडीवर असून देखील तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा दुसरा डाव केवळ 36 धावांवर संपल्याने भारताला पराभवाचे तोंड बघावे लागले. या पराभवानंतर भारतीय संघाला पुनरागमन करणे अवघड जाणार, असे मत अनेक क्रिकेट पंडितांनी मांडले आहे.
भारताचा दुसरा सामना मेलबर्न ग्राउंड वर 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला या सामन्यात पुनरागमन करण्याची आशा आहे व आकडे देखील संघाला विजयाची खात्री देत आहेत.
मेलबर्न क्रिकेट मैदान हे अनेक वेळा भारतीय संघासाठी जीवनदायिनी ठरले आहे. या मैदानावर 2018 साली झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात भारताकडून चेतेश्वर पुजाराने शानदार शतकी खेळी केली होती. तसेच गोलंदाज जसप्रीत बुमराहने देखील ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले होते.
भारतीय संघाने मेलबर्न येथे आपला पहिला सामना 1948 झाली खेळला होता. 1978 पर्यंत भारतीय संघाला येथे एकही सामना जिंकता आला नाही. मात्र 1978 साली झालेल्या सामन्यात भारताने 222 धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यानंतर 2011 पर्यंत पुन्हा भारतीय संघाला पराभव पत्करावे लागले होते.
पण नंतर 2014 साली झालेल्या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट खेळ खेळत सामना अनिर्णीत ठेवला होता व शेवटचा 2018 साली झालेला सामना भारताने 137 धावांनी जिंकला होता. आकड्यांवर नजर टाकली असता एक बाब लक्षात येते की मागील 10 वर्षात भारतीय संघ मेलबर्न येथे उत्तम कामगिरी करत आहे.
2018 साली झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना चेतेश्वर पुजाराच्या शतकी खेळीच्या जोरावर 433 धावांपर्यंत मजल मारली. प्रतीउत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ 151 धावांवर सर्व बाद झाला. भारताने दुसरा डाव 8 गडी गमावत 106 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचे आव्हान होते, मात्र ऑस्ट्रेलिया संघ केवळ 261 धावाच करू शकला व भारताने 137 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
विराट कोहली परतला भारतात
पालकत्व रजा घेवून विराट कोहली भारतात परतला आहे. त्यामुळे भारतीय संघ कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाला मेलबर्नवर 2018 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची आशा असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
स्टीव्ह स्मिथने थोपटली भारतीय फिरकीपटू आर अश्विनची पाठ; म्हणाला…
आनंद गगनात मावेना! क्रिकेट पाहताना चिमुकल्यांचा उत्साह कॅमेऱ्यात कैद, फोटो तुफान व्हायरल
मोठी बातमी! भारताविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीसाठी असा असणार ऑस्ट्रेलियाचा ११ जणांचा संघ
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: विश्वचषकात भल्याभल्या क्रिकेटर्सला न जमलेला विक्रम करणारी ‘ती’ पहिलीच
गुडबाय २०२०: दिग्गज ५ खेळाडू ज्यांनी यावर्षी जगाचा निरोप घेत क्रीडा जगताला हेलावून सोडले