रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारतीय संघ उतरला. मुंबई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार विजय साजरा केलेला. मात्र, या सामन्यात भारतीय फलंदाजांना पूर्णतः अपयश आले. ऑस्ट्रेलियाच्या सर्वच वेगवान गोलंदाजांनी भेदक मारा करत भारताचा डाव अवघ्या 117 धावांवर संपुष्टात आणला. त्याचबरोबर घरच्या मैदानावर भारतीय संघाकडून एक नकोसा विक्रम देखील जमा झाला.
प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर भारतीय फलंदाज या संधीचा फायदा घेऊ शकले नाहीत. मिचेल स्टार्कच्या चार बळींमुळे भारतीय संघाचे पाच फलंदाज केवळ 49 धावांमध्ये माघारी परतले. विराट कोहलीने 31 व अक्षर पटेलने नाबाद 29 धावा केल्यामुळे भारतीय संघाला कशीबशी 117 पर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्क याने सर्वाधिक 5 बळी मिळवले.
या 117 धावांसह भारतीय संघाच्या नावे घरच्या मैदानावर एक नकोसा विक्रम जमा झाला. घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना वनडे सामन्यात भारतीय संघाचा हा दुसरी निच्चांकी धावसंख्या आहे. भारतीय संघाने वनडे क्रिकेटमधील पहिल्या डावातील आपली सर्वात कमी धावसंख्या श्रीलंकेविरुद्ध 2017 मध्ये नोंदवली. त्यावेळी भारतीय संघ केवळ 112 धावांवर सर्वबाद झालेला. 1990 मध्ये श्रीलंकेविरुद्धच मडगाव वनडेत भारत केवळ 136 धावाच बनवू शकलेला. तर, 2007 मध्ये वडोदरा येथील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव 148 धावांमध्ये गुंडाळला होता.
दुसऱ्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची वनडेतील सर्वात कमी धावसंख्या 78 आहे. 1986 मध्ये भारताला श्रीलंकेने या धावसंख्येवर सर्वबाद केले होते. तर, 1993 मध्ये वेस्ट इंडिजने भारताचा डाव केवळ 100 धावांवर संपवला होता.
(India Register Second Lowest Total In ODI While Batting First)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टार्कच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांची दाणादाण! टीम इंडिया 117 धावांवर ऑलआउट
स्मिथने चित्त्याच्या चपळाईने घेतला कॅच, ऑस्ट्रेलियन कर्णधाराची लवचिकता पाहून रोहित अवाक