भारत-इंग्लंड (India vs England) दुसरा टी20 सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2 विकेट्सने शानदार विजय मिळवला. दरम्यान युवा प्रतिभावान फलंदाज तिलक वर्माने भारतासाठी शानदार अर्धशतक झळकावले. त्याच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला.
इंग्लंडने दिलेल्या 166 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात खूपच खराब झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्त:त तंबूत परतले. दरम्यान संजू सॅमसनने 5, तर अभिषेक शर्माने 12 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 55 चेंडूत 72 धावांची खेळी केली. दरम्यान तिलकने 4 चौकारांसह 5 षटकार ठोकले. कर्णधार सूर्यकुमार यादव देखील मोठी खेळी करण्यात अयशस्वी ठरला. तो 12 धावांवरतीच तंबूत परतला. ध्रुव जुरेल 4 धावा, हार्दिक पांड्या 7 धावा, वाॅशिंग्टन सुंदर 26 धावा, अक्षर पटेल 2 धावा, अर्शदीप सिंग 6 धावा, रवी बिश्नोई 9 धावा यांच्या जोरावर भारताने 166 धावांचे लक्ष्य गाठले. भारताच्या एका बाजूने विकेट्स जात असताना तिलक वर्माने एक बाजू लढवली आणि भारताला शानदार विजय मिळवून दिला.
भारताने टाॅस जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. प्रत्युतरात इंग्लंड संघाने 9 गडी गमावून 165 धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) इंग्लंडसाठी 150च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक 45 धावा केल्या. दरम्यान त्याने 2 चौकारांसह 3 षटकार लगावले. तर ब्रायडन कार्सेने (Brydon Carse) 31 धावांची खेळी केली. जेमी स्मिथ 22 धावा, हॅरी ब्रुक 13 धावा, लियाम लिव्हिंगस्टोन 13 धावा, जोफ्रा आर्चर 12 धावा, आदिल राशिद 10 धावा यांच्या जोरावर इंग्लंडने 165 धावा केल्या होत्या.
भारतासाठी उपकर्णधार अक्षर पटेलने (Axar Patel) फिरकीची जादू दाखवत 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या, तर वरूण चक्रवर्तीने (Varun Chakravarthy) पुन्हा एकदा इंग्लंडची फिरकी घेत 2 फलंदाजांना तंबूत पाठवले. अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या, वाॅशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतली.
दुसऱ्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-
भारत-संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
इंग्लंड- बेन डकेट, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड
महत्त्वाच्या बातम्या-
पुनरागमनासाठी सज्ज होतोय विराट, माजी फलंदाजी प्रशिक्षकासोबत तयारी सुरू! VIDEO
IND vs ENG; कर्णधार जोस बटलरची एकतर्फी झुंज! भारतासमोर 166 धावांचे आव्हान
IND vs ENG; दुसऱ्या टी20 सामन्यातही शमीला संधी नाही, कधी होणार पुनरागमन?