जागतिक कसोटी अजिंक्यपदाची गदा जिंकण्याचे स्वप्न भारतीय संघाने शनिवारी (10 जून) जिवंत ढेवले. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ बुधवारी (7 जून) आमने सामने आले. अभय संघांतील या सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ 280 धावांनी आघाडीवर आहे. शेवटच्या दिवशी भारतीय संघ 3 बाद 164 धावांपासून पुढे फलंदाजीला सुरुवात करेल. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे चौथ्या दिवसाच्या शेवटी अनुक्रमे 44* आणि 20* धावांसह खेळपट्टीवर कायम आहेत.
भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गदा उंचावण्यापासून अवघ्या एका पावलाच्या अंतरावर आहे. पण यासाठी संघातील फलंदाजांना शेवटच्या दिवशी संयमी खेळ दाखवत 280 धावांची आघाडी मोडून काढावी लागणार आहे. भारतीय संघाच्या हातात अजून 7 विकेट्स आहेत. अशात विजय संघासाठी अपेक्षेपेक्षा सोपा झाल्याचे दिसते.
डब्ल्यूटीसी फायनलच्या चौथ्या दिवसाचा एकंदरीत विचार केला, तर दिवसाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियासाठी मार्नस लाबुशेन (41*) आणि कॅमरून ग्रीन (7*) खेळपट्टीवर आले. शनिवारी खेळपट्टीवर आल्यानंतर लाबुशेन एकही धाव न करता 41 धावांवर बाद झाला. दुसरीकडे कॅमरून ग्रीनने मात्र आपला डाव 25 धावांपर्यंत नेला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा ऍलेक्स केरी (66*) सोडला, तर एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. शनिवारी दुसरे सत्र संपण्याआधीच ऑस्ट्रेलियन संघाने 8 बाद 270 धावा करून डाव घोषित केला. तत्पूर्वी पहिल्या डावात देखील ऑस्ट्रेलियन संघ आघाडीवर असल्यामुळे भारताला शेवटच्या डावात विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य मिळाले.
चौथ्या दिवसाच्या चहापानापर्यंत भारताने 1 बाद 41 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी भारताने वरच्या फळीतील तीन महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यात दिवसाखेर 71* धावांची भागीदारी झाली. भारतीय संघाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा याने 43 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. चौथ्या दिवशी मोहम्मद भारतासाठी मोहम्मद शमी याने दोन, तर रविंद्र जडेजा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियन संघ गोलंदाजीला आल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड आणि नेथन लायन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (India scored 164 for 3 on the fourth day of the WTC final. Australia lead by 280 runs)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाच्या ‘सिंहा’पुढे रोहितची होते चिडीचूप, आतापर्यंत कसोटीत ‘इतक्यांदा’ दाखवला तंबूचा रस्ता
शुबमनसोबत ‘ते’ गलिच्छ कृत्य करताना विराट कॅमेऱ्यात कैद, पाहून नेटकरीही म्हणाले, ‘लाज वाटते तुझी’