गोल्ड कोस्ट | भारताने २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी २२५ पेक्षा जास्त खेळाडूंचा चमू आॅस्ट्रेलियाला पाठवला होता. त्यात १५ प्रकारात भारतीय खेळाडूंनी भाग घेतला होता.
२२५ पैकी १२ खेळाडू हे कुस्तीपटू होते आणि विशेष म्हणजे या १२ पैकी १२ खेळाडूंनी पदक मिळवले आहे. म्हणजेच या क्रीडा प्रकारात भारताला २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत १००% यश मिळाले आहे.
या स्पर्धेत भारताने६६ पदके मिळवत पदकतालिकेत तिसरे स्थान प्राप्त केले आहे. भारताने या स्पर्धेत २६ सुवर्णपदक, २० रौप्यपदक आणि २० कांस्यपदक मिळवले आहे.
गोल्ड कोस्टमध्ये झालेली २१ वी राष्ट्रकुल स्पर्धा भारतासाठी तिसऱ्या क्रमांकाची यशस्वी राष्ट्रकुल स्पर्धा ठरली आहे. याआधी भारताने २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत १०१ पदके मिळवली होती. तसेच मेलबर्नला २००मध्ये भारताने ६९ पदकांना गवसणी घातली होती. तर ग्लासगो येथे झालेल्या २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ६४ पदके मिळाली होती.
यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला नेमबाजी (१६) , कुस्ती(१२), बाॅक्सिंग (९) , वेट लिफ्टिंग (९), टेबल टेनिस (८) , बॅडमिंटन (६) , अॅथलेटिक्स (३) , स्कॅवश (२) आणि पॅरो पाॅवरलिफ्टिंगमध्ये (१) पदके मिळाली आहेत.
कुस्ती –
सुवर्णपदक – विनेश फोगट (५० किलो), सुमित मलिक (१२५ किलो), राहुल आवारे (५७ किलो), बजरंग (६५ किलो), सुशील कुमार ( ७४किलो),
रौप्यपदक – मौसम खत्री (९७ किलो), बबिता कुमारी ( ५३ किलो), पुजा धंदा ( ५७ किलो)
कांस्यपदक – साक्षी मलिक (६२ किलो), सोमवीर (८३ किलो), दिव्या काकरान (६८ किलो), किरण ( ७६ किलो)