---Advertisement---

कुस्तीप्रेमींसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र केसरीची रणधुमाळी उद्यापासून

Maharashtra Kesari
---Advertisement---

कुस्तीप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने 26 ते 30 मार्चदरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेचे संयोजन आमदार रोहित पवार यांनी केले असून, अंतिम सामन्यात वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उपस्थिती स्पर्धेच्या उत्साहात भर घालणार आहे. संपूर्ण राज्यभरात या स्पर्धेबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून, कुस्ती शौकिनांची नजर या थरारक लढतींकडे लागली आहे.

अहिल्यानगर येथे 2 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने भव्यदिव्य महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मात्र, या स्पर्धेचा अंतिम सामना व त्याचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला. निकालावरून कुस्ती क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले, आणि संपूर्ण राज्यभर या निकालावर चर्चा रंगली.

याच पार्श्वभूमीवर, रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन महत्त्वपूर्ण घोषणा केली. कर्जत येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदच्या वतीने पुन्हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या निर्णयाने कुस्तीविश्वात नवीन ऊर्जा संचारली असून, कुस्तीप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

या स्पर्धेचे संयोजक अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ व आमदार रोहित दादा पवार यांच्या जबाबदारीमध्ये पार पडणार आहे. तसेच ही स्पर्धा दादा पाटील महाविद्यालयाच्या शेजारच्या मैदानात रंगणार आहे. अहिल्यानगर तालीम संघ व कर्जत जामखेड कुस्तीगीर यांच्या सहकार्याने आणि रोहित पवार मित्र मंडळ यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---