---Advertisement---

ईशान किशन नावाचं वादळ! अवघ्या 20 चेंडूंत अर्धशतक झळकावत मैदानात उडवला धुरळा

On: बुधवार, फेब्रुवारी 4, 2026 9:17 PM
---Advertisement---

​डी.वाय. पाटील स्टेडियमवर ईशान किशनने आपल्या तुफानी फलंदाजीने चाहत्यांचे भरभरून मनोरंजन केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सराव सामन्यात (Warm-up match) ईशानने आपल्या स्फोटक फलंदाजीने मैदान गाजवले. अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी उतरलेल्या ईशानने क्रीझवर येताच चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. या यष्टिरक्षक फलंदाजाने धडाकेबाज शैलीत खेळताना अवघ्या २० चेंडूंत आपले अर्धशतक ठोकले.

​न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या धमाकेदार कामगिरीचे फळ ईशान किशनला सराव सामन्यात मिळाले आणि तो अभिषेकसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला. ईशानने या संधीचे पूर्णपणे सोने केले. त्याने २० चेंडूंच्या आपल्या खेळीत ५३ धावा कुटल्या.

​ईशान जबरदस्त लयीत दिसला आणि त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा अक्षरशः धुव्वा उडवला. ‘रिटायर्ड आऊट’ होण्यापूर्वी या यष्टिरक्षक फलंदाजाने खेळलेल्या २० चेंडूंत २६५ च्या स्ट्राईक रेटने तडाखा देत ५३ धावा केल्या. आपल्या या खेळी दरम्यान ईशानने २ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार खेचले.

​ईशान किशन आणि अभिषेक शर्मा या जोडीने मिळून अॅनरिक नॉर्टजेच्या पहिल्याच षटकात चौकार-षटकारांची बरसात केली. अभिषेकने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून तो प्रेक्षकांमध्ये पाठवला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत त्याने स्ट्राईक ईशानला दिली. ईशानने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग दोन षटकार ठोकले. पाचव्या चेंडूवर ईशानच्या बॅटमधून चौकार निघाला, तर षटकाचा शेवटचा चेंडू देखील या यष्टिरक्षक फलंदाजाने प्रेक्षकांमध्ये पाठवण्यात यश मिळवले. अशा प्रकारे नॉर्टजेच्या एकाच षटकात एकूण २९ धावा वसूल करण्यात आल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---