भारतीय कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी (13 जानेवारी) उशिरा करण्यात आली. या दोन्ही सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. तर, टी20 क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच कसोटी संघाचा भाग बनला आहे.
India’s squad for first 2 Tests vs Australia:
Rohit Sharma (C), KL Rahul (vc), Shubman Gill, C Pujara, V Kohli, S Iyer, KS Bharat (wk), Ishan Kishan (wk), R Ashwin, Axar Patel, Kuldeep Yadav, Ravindra Jadeja, Mohd. Shami, Mohd. Siraj, Umesh Yadav, Jaydev Unadkat, Suryakumar Yadav— BCCI (@BCCI) January 13, 2023
चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे सुरू होईल. या मालिकेसाठी बराचसा भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध खेळलेला आहे. कर्णधार रोहित शर्मा संघात पुनरागमन करेल. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत असलेल्या ईशान किशन व सूर्यकुमार यादव यांना प्रथमच कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले आहे. ईशान याच्याकडे निवडसमिती दुखापतग्रस्त रिषभ पंतचा पर्याय म्हणून पाहते.
जसप्रीत बुमराह अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्याने या पहिल्या दोन सामन्यात दिसणार नाही. त्याचवेळी अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा याचा संघात समावेश केला गेला आहे. मात्र, सामन्याआधी त्याला आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत व सूर्यकुमार यादव.
(India Sqaud Announced For Border-Gavaskar Test Series Against Australia Suryakumar Yadav And Ishan Kishan Include)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतूनही रोहित-विराटचा पत्ता कट! पृथ्वीला मिळाली संधी