पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा विश्वचषक खेळला जाणार आहे. नुकताच वनडे विश्वचषक 2023 पार पडला. अशात पुढच्या वर्षी लगेच विश्वचषक कसा, असा प्रश्न काहींना पडला असेल. पण पुढच्या वर्षी खेळला जाणारा आयसीसी विश्वचषक 19 वर्षांखालील संघांचा आहे. बीसीसीआयने या विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
भारताच्या 19 वर्षांखालील संघाला वनडे विश्वचषकाआधी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघासोबत त्रिकोणीय मालिका खेळायची आहे. 29 डिसेंबर 2023 रोजी ही मालिका सुरू होणार असून मालिकेतील शेवटचा सामना 10 जानेवारी 2024 रोजी खेळला जाईल. त्यानंतर आयसीसीचा 19 वर्षांखालील वनडे विश्वचषकाची सुरुवात 19 जानेवारी रोजी होणार आहे. भारताला विश्वचषकातील आपला पहिला सामना 20 जानेवारी रोजी बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे. अर्शीन कुलकर्णी आणि सचिन धस या दोन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंनाही या संघात स्थान मिळाले आहे. (India squad announced for U-19 ODI World Cup 2024)
दक्षिण आफ्रिकेतील त्रिकोणीय मालिका आणि 19 वर्षांखालील वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघ –
अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव, सौम्य पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.
महत्वाच्या बातम्या –
AUS vs BAN: ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला कसोटी मालिकेचे वेळापत्रक बदलण्याची केली विनंती, ‘या’ कारणामुळे होणार मालिकेत बदल
उध्वस्थ व्हाल! भारत दौऱ्यावर इंग्लंडने करू नये ‘ही’ चूक, माजी दिग्गजाचा थेट इशारा