जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 19 एप्रिल रोजी या सामन्यासाठी संघाची घोषणा केली होती. त्यानंतर आता मंगळवारी (दि. 25 एप्रिल) बीसीसीआयने भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये एका अनुभवी खेळाडूचे दणक्यात पुनरागमन झाले आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आहे. रहाणेला संघात स्थान मिळाल्यामुळे क्रिकेटप्रेमीही भलतेच खुश झाले आहेत.
अजिंक्य रहाणेचे एक वर्षानंतर पुनरागमन
अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने तब्बल 1 वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याने त्याचा अखेरचा कसोटी सामना मागील वर्षी जानेवारीमध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. रहाणे सध्या आयपीएल 2023मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून तुफान प्रदर्शन करत आहे. त्याने आतापर्यंत अवघ्या 5 सामन्यात फलंदाजी करताना 52.25च्या सरासरीने 209 धावा चोपल्या आहेत. कदाचित रहाणेची हीच कामगिरी पाहून त्याला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी निवडले आहे.
https://twitter.com/BCCI/status/1650734453076148224
महत्त्वाचे खेळाडू संघाबाहेर
विशेष म्हणजे, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघातून महत्त्वाचे खेळाडू बाहेर पडलेत. त्यात जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. सूर्यकुमारने नुकतेच ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा कसोटी पदार्पण केले होते. मात्र, त्याला खास कामगिरी करता आली नव्हती. तसेच, जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघात सामील होऊ शकला नाहीये.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ दुसऱ्यांदा
विशेष म्हणजे, भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एन्ट्री केली आहे. यापूर्वी भारताने 2021मध्ये खेळल्या गेलेल्या डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा सामना केला होता. मात्र, या सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. (india squad wtc final ajinkya rahane comeback in team)
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भारत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! WTC फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ दिग्गज खेळाडूचे संघात दणक्यात पुनरागमन
मातीशी नाळ जोडलेला वॉर्नर! आधी भुवीच्या पडला पाया, नंतर मारली कडकडीत मिठी; मन जिंकणारा व्हिडिओ पाहाच




