ओडिशा येथे शुक्रवारी (13 जानेवारी) हॉकी विश्वचषकाला प्रारंभ झाला. यजमान भारतीय हॉकी संघाने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आपल्या मोहिमेला सुरुवात केली. स्पेनविरुद्धच्या आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 2-0 असा विजय मिळवत विजयी प्रारंभ केला. भारतासाठी अमित रोहिदास व हार्दिक सिंग यांनी निर्णायक गोल झळकावले.
First game, first win. ✅
Team India began the World Cup with a victory. 🤩🤩💥🇮🇳 IND 2:0 ESP 🇪🇸#HockeyIndia #IndiaKaGame #HWC2023 #StarsBecomeLegends @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/xq2PJ0QLdy
— Hockey India (@TheHockeyIndia) January 13, 2023
राऊरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघ हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वात उतरला. टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्रांच बदक मिळवलेल्या भारतीय संघाला या विश्वचषकात विजेतेपदाची संधी आहे. भारतीय संघाने या पहिल्या सामन्यात तसाच खेळ दाखवला.
भारताला पहिल्याच क्वार्टरमध्ये 12 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, हा पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावण्यात भारतीय संघाला अपयश आले. त्यानंतर सलग दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरवेळी रिबाऊंड झालेल्या चेंडूवर अमित रोहिदासने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये हार्दिक सिंग याने एक गोल झळकावत भारताची आघाडी दुप्पट केली. त्यानंतर दोन्ही संघांनी आक्रमण केले मात्र कोणत्याच संघाला गोल झळकावण्यात यश आले नाही. अखेरीस, हा सामना भारताने आपल्या खिशात घातला.
दिवसातील पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाने दक्षिण आफ्रिकेचा 1-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फ्रान्सचा 8-0 असा धुव्वा उडविला. दिवसातील तिसऱ्या सामन्यात ब्रिटनने आपले शेजारी वेल्सचा 5-0 असा पाडाव केला.
(India starts hockey World Cup campaign with win Over Spain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तो आला, त्याने मॅच जिंकून दिली; तरीही ड्रेसिंग रूममध्ये का खावा लागला ओरडा?, कुलदीपचा मोठा खुलासा
रोहितने दिली संधी, पण कुलदीपने भलत्याच खेळाडूचे गायले गुणगान; म्हणाला, ‘त्याने मला नेहमीच पाठिंबा दिला’